Screenshot_20230914_100538
  • खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी /गोव्याहून मध्य प्रदेश कडे निजामुद्दीन एक्सप्रेस ने जाणाऱ्या त्या आठ तरुणांना चॉकलेट व चिप्स मधून गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला सदर बेसुद्दा अवस्थेत आढळलेले आठ तरुण शुद्धीत आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या समोर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. चॉकलेट व चिप्समधून गुंगीचे औषय देऊन मध्यप्रदेशमधील आठ तरुणांना हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये लुटण्यात आले होते. सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आला होता. ही संपूर्ण घटना गोव्याच्या हद्दीत पडल्याने हे प्रकरण गोवा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. दरम्यान रेल्वेत करणारी ही आंतरराज्य टोळी असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे असाच प्रकार बिहार दिल्ली भागातही काही दिवसांपर्वी घडला होता. अशाच चोरट्यांना गजाआड करण्यात आले होते.
  • त्या सर्व आठ तरुणांची प्रकृती सुधारली असून सर्व तरुण शुद्धीवर आल्यानंतर राजसिंग लक्ष्मीप्रसाद खंगार (वय १९) रा. लरखास, टिकामनगर, मध्यप्रदेश या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी सायंकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
  • राज सिंग यांच्यासोबत पुष्पेंद्र रामकिशोर राजक (वय १९) रा. लरखास, टिकमनगर कृष्णा मन्साराम (वय १८), ओम प्रकाश मुन्शी (वय १८), अजय प्रताप पालवी (वय २३), आकाश श्रावण पालवी (वय १८), शिवा चोगेलाल पालवी (वय १८), विकास श्रवण पालवी (वय २१) सर्व रा. हिरवा, जिं. खांडवा, मध्यप्रदेश अशी शुद्धीवर आलेल्या तरुणांची नावे आहेत हे सर्वजण मोलमजुरीसाठी गोव्याला गेले.
  • शुद्धीवर आल्यानंतर या तरुणांनी रेल्वेत कशा पद्धतीने आपली लूट झाली, यांची रेल्वे पोलिसांनी माहिती दिली आहे. गावाला जाण्यासाठी हे सर्वजण सोमवारी वास्को रेल्वेस्थानकावर पोहोचले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील जनरल बोगीत बसले. रेल्वे सुटल्यानंतर थोड्याच वेळात या तरुणांजवळ चौथे भामटे आले त्यांनी या तरुणांची ओळख विचारली. आपणही मध्यप्रदेशलाच जात असल्याचे सांगितले.
  • मडगाव रेल्वेस्थानक येण्याआधी तरुणांना भामट्यांनी या तरुणांना खाण्यासाठी चॉकलेट व चिप्स दिले. खाण्यास नकार देऊनही आग्रह करून त्यांना खाण्यासाठी भाग पाडण्यात आले. चॉकलेट व चिप्स खाल्ल्यानंतर गुंग चडली. सर्वजण झोपी गेले. सावर्डेजवळ चेन ओढून रेल्वे थांबवून चौघा भामट्यांनी तेथून पलायन केल्याचे पोलीस तपासात उपडकीस आले आहे.
  • दरम्यान त्या भामट्यानी तरुणांच्या खिशातील सात मोबाईल ‘अस सच सुमारे २५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण लाखाचा ऐवज पळविला पासून खिशातील ही काही किरकोळ रक्कम त्यांनी लांबवल्याचे पोलिसांना सांगितले. सदर प्रकरणाचा गोवा पोलीस कसून तपास करत आहेत.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us