बेळगांव: दरवर्षी देण्यात येणारा “गुरुवर्य सुभानराव राणे सन्मान पुरस्कार डॉ.संजय पंतबाळेकुंद्री यांना पेझारी (अलिबाग) येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
दक्षिण मुंबईचे खासदार माजी केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे नेते श्री.अरविंद सावंत व आमदार श्री.पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते मानपत्र ,श्रीफळ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
गुरुवर्य सुभानराव राणे (पेझारी)प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील नामवंत विद्यार्थी व विशेष गुणकौशल्य असणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा सन्मान अलिबाग आमदार श्री.पंडित शेठ पाटील व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
पंतभक्तांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास संस्थान ट्रस्टी श्री. रंजन पंत,अध्यक्ष श्री.राजीव पंत, अभिजीत पंत सत्यजित पंत व सदस्य बबन कदम,सुहास सातोस्कर, रमेश कुलकर्णी, संजय राव,रवींद्र नाईक,दिनेश सुर्वे,उपस्थित होते.
या वेळी सर्व वरील मान्यवरांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास रायगड ,मुंबई ,अलिबाग,पेझरी भागातील पंतभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.