- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : अलीकडच्या काळात बेरोजगारी वाढत चालली सुशिक्षित युवक युवती अनेक आहेत. मात्र त्यांना योग्य दिशा मिळत नसल्याने अनेक जण उत्तम नोकरी उत्तम व्यवसायापासून दूर आहेत. अशा युवकांना युवतीना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी पृथ्वी इन्स्टिट्यूट सारखी संस्था नेहमी प्रेरणादायी याचा तालुक्यातील बेरोजगार युवक युतीने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. खानापूर येथील पृथ्वी इन्स्टिट्यूटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाझिया सनदी होत्या. प्रमुख वक्ते म्हणून ज्योती करियर अकादमी चे संचालक अमित सुब्रमण्यम उपस्थित होते.
- प्रारंभी संचालक अझर मुल्ला यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी भारतीय सेना ( प्यारा मिलिटरी फोर्स ) एस एस सी (जी डी) मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी उत्तीर्ण झालेले उमेदवार मयुरी अंधारे (CRPF)यडोगा. माधुरी अंधारे (CRPF)यडोगा. रोहिणी नांदुरकर(SSB)लकेबेल, ललीता गुरव(ITBP) गणेबैल. प्रदीप देसुरकर(CRPF)झाडनावगे. प्रशांत देसूरकर(assam rifles) झाडनावगे. नितेश विर(ITBP) घोटगाळी. परशराम कदम(BSF) ज्ञानदेव बिर्जे(BSF)नंदगड. वैष्णव पाटील(BSF) मुंदवाड. नयन घाडी(CRPF)कौंदल. सूरज बिर्से (BSF)खानापूर या युवक युवतींचा सन्मान करण्यात आला .
- यावेळी पृथ्वी इन्स्टिटयूटचे संचालक पुंडलिक गावडा, तसेच सूरज पाटील, संजय बावकर, मंथन देसाई यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व इतर विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गावडे यांनी केले तर आभार संचालक क्रांतिराज प्रज्ञावंत यांनी केले.
- टिप =
- 2023=24 मध्ये एसएससी जीडी ची नवीन भरती निघत आहे साधारण 50 हजार जागा निघत आहेत. त्याची अर्ज करण्याची तारीख, 14 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहे आणि त्याची ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024. मध्ये होत आहे. त्यासाठी 25 सप्टेंबर 2023 पासून पृथ्वी इन्स्टिट्यूट खानापूर येथे परीक्षेचे वर्ग सुरू होत आहेत. क्लासेस साठी प्रवेश सुरू आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9632873102/ 8073024147/ 9739532377.