खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी
चापगाव ते हडलगा या रस्ता विकास कामासाठी नाबार्ड योजनेअंतर्गत आमदार यांनी 1 कोटी 85 लाखाचा निधी मंजूर केला आहे या अंतर्गत रस्त्याचे काम सुबधरीत्या सुरू आहे. हाडलगा गावापासून अल्लेहोल तलावापर्यंत रस्त्याचे काम सुरू असून उर्वरित रस्ता कामासाठी अधिक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तोपर्यंत रस्त्याची डागडुजी करून काम पूर्ण केले जाईल असे सुचोवात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. शनिवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांची बेकवाड ग्रामपंचायत क्षेत्रातील हाडलगा भागाच्या सदस्यांनी भेट घेऊन विकास कामासंदर्भात व बस सुविधा संदर्भात चर्चा केली यावेळी ते बोलत होते.
ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामे मार्गी लावा..
दरम्यान बेकवाड ग्रामपंचायत अंतर्गत हडलगा गाव परिसरातील अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. मागील वर्षी यात्रेच्या निमित्ताने बेकवाड भागात काम मंजूर करून पूर्ण करण्यात आली त्यावेळी हडलगा, बंकी बसरीकट्टी भागात येणारी जवळपास 40 लाखाची कामे आजही प्रलंबित आहेत. ती कामे तात्काळ सुरू करण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे पंचायत सदस्यांनी विनंती केली. त्यावेळी तालुका पंचायत अधिकाऱ्यांना आमदारांनी फोन करून ताबडतोब या गावची थकीत कामे मार्गी लावण्यासाठी अंतरिम मंजुरी द्यावी अशी सक्त सूचना केली आहे.
चापगाव -हडलगा मार्गावर बस सुविधेचा प्रस्ताव
पूर्वी खानापूर ते चापगाव- हडलगा पर्यंत बस सुविधा होती. पण रस्त्यामुळे ती बंद पडली होती. यासाठी या मार्गावर बस सुविधा करण्यात यावी अशी विनंती पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे यावेळी केली. तातडीने आमदारांनी बस आगार प्रमुखाला दूरध्वनीद्वारे या रस्त्यावर बस सुविधा करण्यात यावी अशी सूचना केली आहे . सध्या खानापूर पासून यडोगा चापगाव पर्यंत बस जाऊन ती जळगा मार्गे खानापूरला येते, तीच बस हाडलगा पर्यंत सोडण्यात यावी व या भागातील शाळकरी मुलांना चापगाव हायस्कूलला ये जा करण्यासाठी किंवा त्या भागातील लोकांना खानापूरला ये जा करण्यासाठी सोईचे होईल अशा पद्धतीची सूचना आमदारांनी केली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष संजय कुबल ,प्रधानकार्यादर्शी मल्लाप्पा मारीहाळ, गुंडू तोपिनाकट्टी , बेकवाड ग्रामपंचायतच्या उपाध्यक्ष मोहिनी येळूरकर, सदस्य नामदेव कोलेकर, सदस्य परशराम दा . मडवाळकर उपस्थित होते.