IMG-20250317-WA0025

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:

राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात उपलब्ध ध्येय निश्चित करून दुसरे यांच्याबरोबर न जाता आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची निर्णय घेण्यासाठी सक्षमता बाळगावी असे मार्गदर्शन प्रमुख वक्त्या म्हणून सौ.अनिता दत्ता कणबर्गी यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सौ अनिता निंगाप्पा पाटील एसडीएमसी सदस्य उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त शिक्षक नारायण भालकेकर व सुजाता नारायण भालेकर, बैलूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. अनिता अनंत सावंत, अनंत सावंत, दत्ता कणबर्गी, शाळा सुधारणा मंडळाचे चेअरमन तुकाराम साबळे व मुख्याध्यापक सी.एस कदम सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेच्या प्रमुख मान्यवर म्हणून माजी विद्यार्थींना बोलावण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थिनी इशस्तवन व स्वागतगीताने केली, कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन शामल चिखलकर, विद्या नावलकर, दया राऊत, दया साबळे, सुनंदा चव्हाण सावंत, ज्योती जोलद (धर्मस्थळ कार्यकारी अधिकारी ), गीता साबळे, प्रतिभा निलजकर देवगिरी या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन नारायण भालकेकर,दत्ता कणबर्गी व अनंत सावंत या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक सीएस कदम सर यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सर्व माजी विद्यार्थिनी त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले .

आयुष्याच्या उभारणीमध्ये शाळा ही महत्त्वाचे कार्य घडवत असते आणि त्यासाठी शाळा सुधारणा होणे ही महत्त्वाची आहे असे मत मांडले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी सर्व साधारण विजेतेपद म्हणून मुलींच्या मध्ये अस्मिता बाळासाहेब बेळगावकर व सरिता देसाई यांना देण्यात आले.

याप्रसंगी निवृत्त शिक्षक नारायण भालकेकर व सुजाता भालकेकर यांनी आपल्या 40 वर्षानंतर भेटणाऱ्या विद्यार्थ्यांची हितगुज साधली त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जर यश संपादन करायचं असेल तर शाळेची तसेच गुरुजनांसी आपले ऋणानुबंध कायमस्वरूपी टिकून ठेवणे ही काळाची गरज आहे असे आपले मत व्यक्त केले. यावेळी कालमनी, दारोळी ओतोळी, वडगाव व ओलमणीच्या माता पालकांची उपस्थिती होती. सर्वांनी इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा म्हणून पारितोषिक त्याचबरोबर प्रोत्साहन पर बक्षीस देऊ केली.

याप्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थिनी रोहिणी महादेव पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात दरवर्षी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला एक हजार एक रुपयाचे पारितोषिक देऊ केले. यावेळी व्यासपीठावरून माजी विद्यार्थिनी म्हणून दीक्षा जगताप व सुनंदा सावंत -चव्हाण, दया पाटील यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनी राधिका गुरव, सरिता देसाई, कीर्ती काजुनेकर शुभेच्छा पर भाषण केले त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या प्रियंका पाटील व प्रवीण नावलकर यांनी अतिशय भावुक भावना व्यक्त केल्या. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी,माजी विद्यार्थिनींचा शाळेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

आपल्या भाषणातून चेअरमन तुकाराम साबळे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला त्याचबरोबर शाळेच्या प्रगतीसाठी मुलांच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून सर्व माजी विद्यार्थिनींनी यथाशक्ती आपापल्या परीने शाळेला मदत करू असे आश्वासन दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्व शिक्षक ए.जे सावंत सर यांनी केले तर आभार एस आय काकतकर सर यांनी मांडले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us