खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- खानापूर शहरात गेल्या 2019 पासून सुरू असलेल्या पृथ्वी इन्स्टिट्यूट तर्फे भारतीय सेनेत भरती होणाऱ्या युवकांच्यासाठी प्रशिक्षण या इन्स्टिट्यूटने आतापर्यंत अनेक युवकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करत भारतीय सेनेत प्रोत्साहन दिले आहे. या इन्स्टिट्यूटच्या वतीने 24 मध्ये बीएसएफ आणि सीआयएसएफ 2024 मध्ये सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक व अभिनंदन सोहळा नुकताच श्री पृथ्वी इन्स्टिट्यूट च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. नव्याने निवड झालेल्या इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजू रामचंद्र भुजगुरव(खैरवाड)CISF मध्ये , तसेच ऋतिकेश बाळकृष्ण कोलेकर. (कौंदल) CISF . गजानन लक्ष्मण मडवळकर (सुल्लेगाली) BSF मध्ये निवड झाली. तसेच परशराम केसरेकर (हलगा) BSF, तसेच ज्ञानेश्वर एन धामणेकर (निडगल) BSF, ओमकार ठोंबरे (रामगुरवाडी) BSF, बाबुराव यलाप्पा किलैकर. (कणबर्गी) BSF मध्ये भरती झाले आहेत. सदर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे पृथ्वीच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
- खानापूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमधील सहभाग वाढविणे, 10 वी /12 वी नंतर भविष्याच्या संधी याची माहिती शालेय जीवनापासून ‘विद्यार्थ्याना व्हावी. या उद्देशाने ‘2019 साली खानापूर येथे पृथ्वी अकॅडमीची स्थापना झाली.
- यावेळी पृथ्वी इन्स्टिटयूटचे संचालक अझर मुल्ला, संचालक पुंडलिक गावडा , संचालक क्रांतिराज प्रज्ञावंत आणि संचालक सुरज पाटील यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले.
- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांतिराज प्रज्ञावंत यांनी तर आभार पुंडलिक गावडा यांनी मानले.
- विध्यार्थ्यांना पृथ्वी इन्स्टिटयूट च्या सर्व संचालक व शिक्षक तसेच आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
- त्यांच्या यशाचे संपूर्ण खानापूर तालुक्यात कौतुक होत आहे..