खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अंगभूत कलागुण विकसित करण्यासाठी श्री गणपती उत्सवाचे औचित्य साधून मराठा मंडळाचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे मराठी लोकधारेवर आधारित लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रायोजक डॉक्टर रफिक हलशीकर, चेअरमन कृषी पतीन सोसायटी घोटगाळी व खानापूर कॅनरा बँकेचे मॅनेंजर मोहन ए डी , परीक्षक सौ. सुप्रिया मेंन्सिनकाई सहशिक्षिका म. मं. ताराराणी हायस्कूल खानापूर, श्रीमती शितल कवचे सहशिक्षिका, मराठा मंडळ सिद्धिविनायक इंग्लिश मेडियम हायस्कूल खानापूर, श्रीमती लक्ष्मी खंडोजी मराठा मंडळ हायस्कूल खानापूर सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी सर्वांचे स्वागत करण्यात आले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप – प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक एन एम सनदी यांनी केले.
बहारदार या लावणी स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर रफिक एन हलशीकर (चेअरमन पी के पी एस घोटगाळी) यांनी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस जाहीर केले. सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला जनतेची सेवा हीच त्यांची ईश्वर सेवा या विचाराने प्रेरित होऊन समाजाची सेवा करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. गरजू लोकांना मदत करणे, त्यांच्याअडीअडचणी दूर करणे, सर्वधर्म समभाव हा त्यांचा स्वभाव आहे. याची जाणीव ठेवून कॉलेजच्या वतीने कॉलेजचे प्राचार्य श्रीमान अरविंद लक्ष्मणराव पाटील यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ हार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कॅनरा बँकचे मॅनेंजर श्रीमान मोहन ए डी यांनी या स्पर्धेसाठी दुसरे बक्षीस जाहीर केले. यांचा कॉलेजचे प्राचार्य ए एल पाटील यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य ए एल पाटील यांचे प्रा. एन ए पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. ज्येष्ठ प्राध्यापक एन ए पाटील यांना प्राध्यापक टी आर जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. परीक्षक म्हणून लाभलेल्या श्रीमती सुप्रिया मेंन्सिनकाई, श्रीमती शितल कवचे, श्रीमती लक्ष्मी खंडोजी यांचे प्राध्यापिका मनीषा एलजी यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमान मोहन ए डी यानी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आपल्या कॅनरा बँकेची वैशिष्ट्ये व विद्या कर्ज याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रफिक हलशीकर यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन पर मार्गदर्शन करताना, आपला अनुभव सांगत कष्टाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थिनींनी ध्येय साध्य करण्यासाठ सतत परिश्रम केले पाहिजेत. असे बहुमोल विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजचे प्राचार्य श्रीमान ए एल पाटील सर यानी ताराराणी कॉलेजमध्ये वर्षभरात घेणाऱ्या उपक्रमाची जाणीव करून दिली. अभ्यासाबरोबर विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आपण राबविणार व खानापूर तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण करणार असे बहुमोल विचार व्यक्त केले. व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला.
यानंतर लावणी महोत्सव स्पर्धेची सूत्रे प्राध्यापक टी आर जाधव यांनी आपल्या हाती घेतली. एका पेक्षा एक अशा बहारदार लावण्यांना सुरुवात झाली. या स्पर्धेत 20 स्पर्धकांनी भाग घेतला होता. शेवटी परीक्षकांचा निकाल हाती आला. प्रथम क्रमांक कुमारी समृद्धी पाटील, द्वितीय क्रमांक कुमारी चंद्रभागा पेडणेकर, तिसरा क्रमांक कुमारी प्रेरणा धामणेकर, उत्तेजनार्थ श्रुती येळूरकर, या सर्व स्पर्धकांना कार्यक्रमाचे पाहुणे डॉ. रफिक हलशीकर कॉलेजचे प्राचार्य श्रीमान ए एल पाटील यांच्या शुभ हस्ते बक्षीशे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, व आभार प्राध्यापक एन एम सनदी व प्राध्यापक टी आर जाधव यांनी केले.