IMG-20230624-WA0122

खानापूर : खानापूर तालुक्यातील निटूर प्राथमिक कृषीपतीन सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक ही एक तालुक्याच्या राजकीय पटलावरील लक्षवेधी निवडणूक होती. या कृषी पतीन सहकारी संघातून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मागील वेळी बिन कर्जदार गटातून संचालक पदाचा मान मिळवला होता. त्यामुळे त्यांनी 2021 मध्ये झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक एक चुरशीची व तालुक्याच्या राजकीय पटलावरील बदलाच्या दिशेचे राजकारण करणारी ठरली होती. परंतु त्या निवडणुकीत विद्यमान संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपला गड कायम राखला. अवघ्या एक दोन मतांनी पराभूत झालेल्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पुन्हा आगामी 2026 मध्ये होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काय रणनीती आखणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. परंतु गेल्या महिन्याभरापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तालुक्याने भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या बाजूने दिलेला कौल लक्षात घेता माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी निटूर कृषी पतीन सहकारी संघाचे बिन कर्जदार गटातून सक्रिय सदस्यत्व असतानाही पुन्हा या सहकारी संघावर संचालक पद मिळवण्यासाठी कोणताही खटाटोप केला नाहीं. जनमताचा कौल लक्षात घेता माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी या कृषी पतीन सहकारी संघाच्या निवडणुकीपासून फारच दूर राहणे पसंद केले. त्यामुळे आता माजी आमदार अरविंद पाटील यांना सध्या तरी आगामी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विरोधकच राहिला नाही. तरीदेखील आगामी तीन-चार वर्षात होणाऱ्या राजकीय घडामोडी यावरून पुढील राजकारण सांगणे कठीण आहे. सद्यपरिस्थितीत माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी खानापूर तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक या नात्याने खानापूर तालुक्यातील 52 कृषी पतीन सहकारी संघावर 100% वर्चस्व राखले आहे. त्यामुळे त्यांचा आगामी सहकार क्षेत्रातील राजकीय मार्ग सध्या तरी सुखकर आहे.

चुरशीच्या निवडणुकीत उपसभापती सुरेश देसाई यांचे वर्चस्व

निटूर प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची निवडणूक शनिवारी चुरशीने पार पडली. या निवडणुकीत दोन जागा बिनविरोध झाल्या. पण उर्वरित जागा करिता निवडणूक झालीच, पण चुरशीच्या निवडणुकीत तालुका पंचायतीचे माजी सभापती व राज्य वननिगमचे माजी संचालक सुरेश देसाई यांचे संपुर्ण पॅनल एकतर्फी निवडून आले आहे. या कामी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांचे सहकार्य अधिक मोलाचे ठरल. या कृषी पतीन सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी उपसभापती सुरेश देसाई व माजी आमदार अरविंद पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. परंतु काही जागांकरिता निवडणूक लादली गेल्याने चुरशीने या संघाची निवडणूक झाली. यामध्ये विद्यमान संचालक माजी सभापती सुरेश देसाई यांचे संपूर्ण पॅनल एकतर्फी निवडून आले आहे. या विजयाबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांनी सुरेश देसाई व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

दोन जागा बिनविरोध, दहा जागा करिता निवडणूक;
निवडणुकीपूर्वी या पॅनलचे दोन संचालक बिनविरोध निवडून आले होते. या मध्ये एस टी गटातून लक्ष्मण बाळाप्पा नाईक निटूर, व बिन कर्जदार गटातून संध्या सागर नार्वेकर निटूर, यांची बिनविरोध निवड झाली होती. परंतु सामान्य गटाकरिता निवडणूक झाली यामध्ये शनिवारी झालेल्या निवडणुकीत सुरेश देसाई यांच्या पॅनलचे संपूर्ण 10 च्या 10 उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. यामध्ये सामान्य गटातून सुरेश नारायण देसाई निटूर, रामचंद्र महादेव मोरे गणेबैल, नामदेव कल्लाप्पा सुळेभाविकर निटूर, मनोहर बरुकर काटगाळी, अशोक विठ्ठल देसाई निटूर, हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर महिला गटातून कविता यल्लाप्पा गुरव निटूर, गंगुबाई गुंडू चौगुले काटगाळी या निवडून आल्या आहेत. “अ” गटातून बाळगौडा रामगौडा पाटील प्रभुनगर, तर “ब” गटातून रूद्राप्पा भीमाप्पा कोणूरी प्रभुनगर, हे निवडून आले आहेत. तर एस सी गटातून नागेश यशवंत मादार हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. या त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us