खानापूर/ पिराजी कुऱ्हाडे:
खानापूर शहरात असलेली खानापूर प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघ नियमित खानापूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी या संस्थेची चुरशीची निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर अनेकांच्या प्रयत्नानंतर या संस्थेची गेल्या 30 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध झाल्याने संस्थेच्या प्रगतीला चालना मिळाली आहे.
खानापूर प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची निवडणूक येत्या 23 तारखेला नियोजित होती . या निवडणुकीत तब्बल 41 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या संस्थेची निवडणूक होणार अशी जवळजवळ चिन्हे असतानाच अनेकांच्या अथक प्रयत्नानंतर या संस्थेची बिनविरोध निवड झाली आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळ खालील प्रमाणे
नव्याने निवड करण्यात आलेल्या संचालक मंडळात विद्यमान अध्यक्ष नारायण लक्ष्मण कार्वेकर , मोदेकोप यासह सुरेश नामदेव सुळकर आसोगा, नारायण भगवंत पाटील करंबळ, अशोक बाबाजी पाटील नागुर्डा, परसराम रामचंद्र ठोंबरे रामगुरूवाडी, संभाजी सहदेव पाटील जळगे, सौ. शारदा संजय देवलतकर मनतुर्गा, सौ.सुनिता सुनील बिरजे शेडेगाळी, बाबुराव गोविंद शिरपूरकर कान्सूली, राजाराम रूकमाना मादार, ओमाना महादेव नाईक आंबोळी, व बिनकर्जदार गटातून शंकर बाळाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदर संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक दत्ता बेळगावकर यांचे विशेष प्रयत्न मार्गी लागले आहेत.
41 इच्छुकांचे होते अर्ज; 29 जणांची माघार
अविनाश पाटील अखेरच्या क्षणी माघार !
खरंतर या संस्थेची निवडणूक सोमवारी सायंकाळी जवळपास बिनविरोध झाली होती पण सामान्य गटातील पाच जागा करिता सहा उमेदवारी अर्ज राहिल्याने या जागे करिता निवडणूक लागणार का? असा प्रश्न होता कारण अविनाश नारायण पाटील मनतुर्गा यांनी अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ओढून धरल्याने प्रश्न निर्माण झाला होता अखेर त्यांनी बँक व्यवस्थापकांच्या विनंतीला मान देऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून माघार घेतलेल्यांचे माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमानी, लैला कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील माजी ता.प सदस्य अशोक देसाई, माजी ता.प. सदस्य महादेव घाडी यांनी अभिनंदन केले.
बिनविरोध निवडीसाठी माघारी घेतलेल्यांची नावे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खालील इच्छुकांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये मशीन नारायण गुरव, बाळू चिमाजी बिरजे, परशराम नारायण लाड, बळीराम बाळकृष्ण देसाई, नामदेव रवळू गुरव, विलास नारायण बेडरे, परशराम यशवंत पाटील,राघोबा परशराम चापगावकर, प्रल्हाद पुंडलिक पाटील, यशवंत बाळू गावडे, मोहन नारायण पाटील, नामदेव सातेरी गुरव, मारुती बाबाजी पाटील, लुमाना बडकू अल्लोळकर, शंकर परशराम शास्त्री, विशाल अशोकराव पाटील, तुळजाराम गणेश गुरव ,रामाप्पा साताप्पा मस्ती, रुक्मिणी धाकलू बिरजे, लक्ष्मी देवाप्पा गुरव , भैरू पुंडलिक कुंभार, रामू अपूनी कालमनकर, परशराम गंगाराम हूडेदार, संदेश प्रल्हाद कोडचवाडकर, नारायण गंगाराम साळुंखे, मारुती धाकलू पाटील, नारायण रामचंद्र लाड, राघोबा कोनेरी मादार, अविनाश नारायण पाटील अशी त्यांची नावे आहेत.
बुधवारी सकाळी 10 वाजता अभिनंदन सोहळा
या सर्व माघार घेतलेल्यांच्या सहकार्यामुळे त्यांचा अभिनंदन सोहळा व तसेच बिनविरोध निवड झालेल्यांचा अभिनंदन सोहळा उद्या बुधवार दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन बँक व्यवस्थापक दत्ता बेळगावकर यांनी केले आहे.