IMG-20260105-WA0025

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :

चापगाव प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक रविवारी मोठ्या चुरशीने पार पडली. जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील पॅनल विरुद्ध शेतकरी विकास पॅनल अशी दुरंगी लढत झाली. यामध्ये शेतकरी विकास पॅनल मधून विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष पिराजी कुऱ्हाडे यांनी हॅट्रिक साधले आहे. तर शिवाजी बसपा मादार हे मागासवर्गीय गटातून या पॅनल मधून निवडून आले आहेत. पिराजी कुराडे यांनी साधलेल्या या हॅट्रिक बद्दल खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विवेक गिरी, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कासिम हट्टीहोळी पदाधिकारी वासुदेव चौगुले, दिनकर मरगाळे, सुहास पाटील, अल्ताफ बसरीकट्टी, सुहास पाटील, प्रसन्ना कुलकर्णी, किशोर मिठारी, संदीप सुतार, ज्योतिबा भेंडीगिरी आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार वासुदेव चौगुले यांनी शुभेच्छा पर विचार मांडले.

तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने सन्मान :

पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांची कृषिपतींवर सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसच्या वतीने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, महंतेश राऊत, काँग्रेस नेते सुरेश जाधव, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, महिला घटकाच्या अध्यक्ष सावित्री मादार, दीपा पाटील, नगरसेवक लक्ष्मण मादार, तोहीत चांदकनावर, गॅरंटी समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, भरतेस तोरोजी, दीपक कवठणकर आदी उपस्थित होते.

मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान :

खानापूर तालुका मराठी संस्कृतीक प्रतिष्ठान तथा प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या वतीने पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांची कृषिपतीन वर निवड झाल्याबद्दल श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, ईश्वर बोबाटे, वासुदेव चौगुले, चेतन लकेबैलकर, मरू पाटील, ऋतिक कुंभार प्रल्हाद मादार अधिक उपस्थित होते. यावेळी शुभेच्छा पर विचार पत्रकार वासुदेव चौगुले यांनी व्यक्त केले.

Oplus_16908288

सोसायटीच्या या पंचवार्षिक निवडणुकीत पत्रकार पिराजी कुराडे यांनी सलग तिसऱ्यांदा या संस्थेवर आपले वर्चस्व कायम राखले आहे 2016 मध्ये पिराजी कुराडे यांची या संस्थेवर निवड झाल्यानंतर त्यांनी त्या संस्थेला प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न केला. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीतही त्यांची चुरशीच्या निवडणुकीत निवड झाली होती. आता पुन्हा 2026 ते 2031 कालावधी करिता झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पिराजी कुऱ्हाडे यांनी ब वर्गातून निवडणूक लढवली व यामध्ये ते भरघोस मतांनी निवडून आले. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us