खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
चापगाव तालुका खानापूर येथे प्रति वर्षाप्रमाणे होणाऱ्या श्री फोंडेश्वर देवाची यात्रा येत्या मंगळवार दि. 3 फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. दोन दिवसाच्या या सोहळ्यात सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता श्री फोंडेश्वर देवाचा पालखी सोहळा होणार आहे. रात्री बारा वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि. 3 रोजी सकाळी सात वाजल्यापासून श्री फोंडेश्वर मंदिरासमोर नवस फेड आदी कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. रात्री नऊ वाजता श्री फोंडेश्वराचा परतीचा पालखी सोहळा होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटीच्या वतीने व उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.