IMG_20240313_102350


खानापूर – करंबळ-खानापूर येथील रहिवासी व खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.आय.आर.घाडी यांचे वडील रूद्राप्पा भरमाण्णा घाडी (वय 90)यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि.14 रोजी पहाटे निधन झाले.अंत्यविधी दुपारी दोन वाजता करंबळ येथे होणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,एक विवाहित मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
खानापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांचे वडील रुद्राप्पा घाडी हे गेल्या महिन्याभरापासून वृद्धापकलीन आजाराने त्रस्त होते. एकीकडे महालक्ष्मी यात्रा, वडिलांची इच्छा यात्रा पाहण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सदोदित वडिलांना महालक्ष्मी देवीचे दर्शन व त्यांना सदृढ ठेवण्यासाठी चांगले प्रयत्न केले. शेवटी आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेना. नाशिवंत देह, जाणार सकळी अशा ऊक्तीप्रमाणे एक दिवस प्रत्येकाला जाण्याचाच आहे. वडिलांची सेवा करून वडिलांना दिलेला मायेचा आधार हा मोठा असून अशा थोर वडिलांच्या आकस्मित जाण्याने घाडी परिवारावर अतिव दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
तसेच आपणास या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर आणि देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

ಖಾನಾಪುರ – ಖಾನಾಪುರ ನಿವಾಸಿ ಹಾಗೂ ಖಾನಾಪುರ ವಕೀಲರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಐ.ಆರ್.ಘಾಡಿ ತಂದೆ ರುದ್ರಪ್ಪ ಭರ್ಮಣ್ಣ ಘಾಡಿ(90)ಅವರು ಬುಧವಾರ ರೋಸಿ 14 ರಂದು ಅಲ್ಪಶಾ ಅಜರಣೆಯಲ್ಲಿ ನಿಧನರಾದರು.ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಗೆ ಕರಂಬಾಳದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಹೆಂಡತಿ, ಇಬ್ಬರು ಗಂಡುಮಕ್ಕಳು, ವಿವಾಹಿತ ಮಗಳು, ಸುನಾ ಮತ್ತು ನಟವಾಂಡೆಯಂತಹ ಕುಟುಂಬ.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us