खानापूर लाईव्ह /प्रतिनिधी:
खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील पी यूसी प्रथम वर्ष, कला व वाणिज विभाग, पि यू सी द्वितीय वर्ष कला व वाणिज्य विभाग विद्यार्थिनींच्या पालकांची कार्यशाळा दिनांक. 08 जुलै 2024 रोजी घेण्यात आली.
पालकांची कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली .
पहिले सत्र पी यू सी द्वितीय वर्ष कला व वाणिज्य विभाग विद्यार्थिनींच्या पालकांची कार्य शाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य श्रीमान अरविंद लक्ष्मणराव पाटील होते.
व्यासपीठावर कॉलेजचे जेष्ठ प्राध्यापक एन ए पाटील, पालक प्रतिनिधी नागेश गणपती नार्वेकर, गोविंद इराप्पा पाटील, सुरेश तुकाराम कुरबर, सौ. अनुराधा चोपडे, कॉलेजची जनरल सेक्रेटरी कुमारी संगीता होसुरकर व पालक वर्ग उपस्थित होते. सर्व उपस्थित पाहुण्यांचे, पालकांचे स्वागत व ईशस्तवन गीत विद्यार्थिनीनी सादर केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मराठा मंडळ संस्थेचे सन्माननीय तत्कालीन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका जे एफ शिवठणकर यांनी केले. प्राध्यापक टीआर जाधव यांनी परीक्षेचा पॅटर्न व मोबाईल या विषयावर मार्गदर्शन केले. तर प्राध्यापक एन ए पाटील यांनी पालकांची जबाबदारी व विद्यार्थ्यांची कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्रीमान गोविंद ईराप्पा पाटील ग्रामपंचायत सदस्य निटूर यांनीही आपली पालक म्हणून कोणती भूमिका आहे. याविषयी विचार व्यक्त केले. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजचे प्राचार्य श्रीमान. ए एल पाटील यांनी पालकांना व विद्यार्थिनींना आपल्या वक्तृत्ववाणीने अनेक उदाहरणे, अनेकदृष्टांत देऊन महत्व पटवून दिले. विद्यार्थिनींनी समोर आलेल्या संकटावर मात करायला शिकले पाहिजे. घाबरून न जाता धाडसाने जिद्दीने पुढचे यश गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना धीर दिला पाहिजे. त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. असे मौलिक विचार व्यक्त केले. आलेल्या सर्व पालकांचे कौतुक केले. शेवटी प्रा.आर पी. झळके यानी आभार मानले.
दुसरे सत्र पीयूसी प्रथम वर्ष कला व वाणिज विभाग या विद्यार्थिनींच्या पालकांची कार्यशाळा कॉलेजचे प्राचार्य श्रीमान. ए. एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले श्रीमान वासुदेव हणमंत पारसेकर, श्रीमान नागेश बसप्पा नायकर, सौ. शिल्पा उर्वीनहट्टी, ज्येष्ठ प्राध्यापक एन ए पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व मराठा मंडळ संस्थेचे सन्माननीय तत्कालीन अध्यक्ष शिक्षण महर्षी कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सत्राचे प्रास्ताविक प्रा एम एम यलजी यांनी केले. प्रा. आय सी सावंत यांनी परीक्षेचा पॅटर्न व मोबाईल या विषयावर व्याख्यान दिले. तर प्राध्यापिका एम वाय देसाई यांनी पालकांची जबाबदारी व विद्यार्थिनींची कर्तव्ये या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षीय समारोप करताना कॉलेजचे प्राचार्य श्रीमान ए एल पाटील यांनी पालकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. तर विद्यार्थिनींना मी विद्यार्थी म्हणून माझे कर्तव्य कोणते. यांची उत्तम उदाहरणे देत योग्य मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले. शेवटी प्राध्यापक नितीन देसाई यांनी आभार मानले. तर दोन्ही सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक एन एम सनदी यांनी केले.