खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
पंढरपूर हे प्रत्येक वारकऱ्यासह भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे प्रतिवर्षी अनेक वारकरी भक्तांची रांग या ठिकाणी असते. खानापूर तालुक्यातील जवळपास आठ हजार वारकरी, शिवाय भक्त या ठिकाणी दरवर्षी ये जा करतात. देवदर्शन घेतात. पण श्रावण महिन्यातील दर्शन हे महत्त्वाचे मानले जाते. यासाठी आपल्या खानापूर तालुक्यासह विविध भागातील नागरिकांना श्रावण महिन्यातील पांडुरंगाचे दर्शन व्हावे यासाठी गेल्या चार वर्षापासून खानापूर तालुक्यातील युवा कीर्तनकार ह भ प विठ्ठल पाटील महाराज कीरहलशी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहयोगातून तीन दिवसाचा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पंढरपूर या ठिकाणी साजरा करत आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पारायण सोहळ्याचे निमंत्रण देताना विठ्ठल महाराज व इतर..
या कार्यक्रमाला खानापूर तालुक्यासह बेळगाव व गोवा तसेच महाराष्ट्रातील अनेक वारकऱ्यांना मित्र परिवाराला एकत्रित करून या सोहळ्यात नामस्मरण, किर्तन नाम जप या कार्यक्रमासह मान्यवरांचा सन्मान सोहळा असा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी गेल्या महिन्याभरापासून ह भ प विठ्ठल पाटील, ह भ प विठोबा सावंत ह भ प दिनकर देसाई सह अनेक ज्येष्ठ संतांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याची तयारी अति घेण्यात आली आहे.
येत्या शनिवार दि. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात शनिवारी सायंकाळी 4 वाजता पोथी स्थापनेने होणार आहे. रविवार दि. एक सप्टेंबर रोजी सकाळी नामस्मरण गाथावाचन आधी कार्यक्रम व त्यानंतर दुपारी उपस्थित मान्यवरांचा सन्मान, रात्री कीर्तन असे अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. तरी या तीन दिवसाच्या सोहळ्यात निमंत्रित मान्यवरांनी तसेच भक्तजनांनी उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर , पीव्हीजी ग्रुपचे श्री प्रसन्नजी घोटगे या सह खानापूर तालुक्यातील विविध राजकीय मंडळी, पत्रकार मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी याचा असे आवाहन हभप विठ्ठल पाटील यांनी केले आहे