बेळगाव :
श्री दत्त संस्थान पंतबाळेकुंद्री, संचलित सौ.यमुनाक्का अन्नपूर्णागृह व आदरणीय कै. दादा भागवत प्रसादालय या पावन वास्तूचा उद्घाटन सोहळा रविवार २६ मार्च २०२३ रोजी थाटामाटात संपन्न झाला. पंतभक्त नामदार श्री आशिष शेलार (मुंबई) व दत्त संस्थांचे मॅनेजींग ट्रस्टी श्री.रंजन पंतबाळेकुंद्री, श्रीदत्त संस्थान अध्यक्ष श्री. राजन पंतबाळेकुंद्री, गोविंदपंत अन्नदान मंडळाचे अध्यक्ष म श्री.अभिजीत पंतबाळेकुंद्री, ट्रस्टी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. मुंबई येथील दादा महाराज भागवत सांप्रदायातील प्रमुख अतिथी, ना.आशिष शेलार सपत्नीक तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य श्री.मंदार शहाडे, श्री.मा.नरेंद्र हेटे तसेच मुंबई, पुणे, इचलकरंजी, कापशी खोरे, गारगोटी, बेळगाव, मिरज, चंदगड, उगार, नाशिक, रायगड, ठाणे, सांगली, कोल्हापूर, जळगाव भागातील पंतभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. श्रीक्षेत्री येणाऱ्या भाविकांना या अन्नछत्रामुळे मोठी सोय होणार आहे.