खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्यातील हजारो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जातात. द्वादशी दिवशी परतीचा प्रवास झाल्यानंतर प्रत्येक गावागावात श्री पांडुरंगाच्या नावाने नैवेद्यधिक कार्यक्रम अर्थात मोमध्याचा कार्यक्रम करून गावात महाप्रसादाचे आयोजन करून या उत्सवाची सांगता करण्याची परंपरा आहे. यानुसार शुक्रवारी तसेच शनिवारी खानापूर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
- तालुक्यातील अनेक गावांच्या बरोबर मनतुर्गा येथील वारकरी व पंढरपूर भाविकांच्या उपस्थितीमध्ये येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात मुंमद्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गावच्या पंच कमिटीचे अध्यक्ष सुधीर पाटील तसेच हभप ज्योतिबा गुरव यांच्या हस्ते श्री विठू माऊली ची पूजा करण्यात आली. यावेळी वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत भजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ह भ प प्रकाश पाटील, ह भ प परशराम बोभाटे, मर्याप्पा देवकरी, महादेव पाटील, बळीराम देसाई , राजाराम देवकरी, मोहन देवकरी, कल्लाप्पा देवकरी, माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णापा पाटील, गाव पंच कमिटीचे सेक्रेटरी नारायण पाटील, पांडुरंग देसाई, संजय गुंडपिकर, यल्लाप्पा देवलकर, बुद्धाप्पा पाटील, बळीराम देवलकर, ईश्वर बोभाटे, प्रदीप बोभाटे रामलिंग चोरलेकर , मारुती चोर्लेकर, दिनकर चोर्लेकर ,रामचंद्र पाटील, मनोहर पाटील, निवृत्त सैनिक ह भ प विजय पाटील यासह गावातील अहवाल वृद्ध महिला भगिनी यांनी सहभाग दर्शवला होता.