
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
पंढरीचा पांडुरंग हा ईश्वरी कलेचा एक वेगळाच अनुभूती देणारा सर्वांचा आवडता देव आहे. या दैवताच्या भक्तीरसात नाहून गेलेल्या प्रत्येक सामान्यातल्या सामान्य भक्ताचा आवडता देव असल्याने याची मनोभावे सेवा होते म्हणून आज गावागावात भजन कीर्तन प्रवचन सारखे कार्यक्रम घडत आहेत. अशा या भक्तिमय कार्यक्रमात उदाहरण आणण्यासाठी संगरगाळी गावाने पहिल्यांदाच भव्य असा रिंगण सोहळा आयोजित करून या भागाला एक प्रति पंढरपूरचे स्वरूप निर्माण केले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे विचार खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तथा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ते ईश्वर घाडी यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी श्री ग्रंथराज पारायण सोहळ्याच्या निमित्ताने संग्रहालय या ठिकाणी आयोजित भव्य रिंगण सोहळ्यात अश्वाची पाद्यपूजा व पालखी पूजा प्रसंगी ते बोलत होते. दोन दिवसाच्या या पारायण सोहळ्यामध्ये गुरुवारी सकाळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, माजी आमदार अरविंद पाटील सह अनेक मान्यवरांच्या हस्ते पोथी स्थापना होऊन या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर 9 वा व 12 वा अध्याय वाचन दिवसभर नामस्मरण प्रवचन गाथा भजन आदी कार्यक्रम पार पडले. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
शुक्रवारी सकाळी काकड आरती झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता भव्य रिंगण सोहळा झाला.
त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाचे सांगता झाली. याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक अधिवक्ते महादेव पाटील, शिवाजी पाटील , कृषीपतींचे अध्यक्ष प्रकाश गावडे, बबन मनोळकर,मिलिन मस्करेन चर्च चे फादर यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
