Screenshot_20240328_095050

खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य, संघटनेच्या अध्यक्षांकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेले जिल्हा पंचायतीचे खानापूर तालुका विभागीय कार्यालयाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता दुरदुंडेश्वर बन्नुर यांच्या निवासस्थानातून लोकायुक्तांनी मोठी रक्कम जप्त केली आहे.

लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्यानंतर लोकायुक्त विभागाचे पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक पुष्पलता, पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, रवी मावरकर, राजश्री भोसले, अभिजीत जमखंडी, एन. एम. मठद आदींचा समावेश असलेल्या पथकाने येळ्ळूर, ता. बेळगाव येथील त्या साहाय्यक कार्यकारी

  • अभियंत्याच्या निवासस्थानातून 27 लाख 75 हजार रुपये रोकड जप्त केली आहे.

मनरेगा योजनेच्या कामांना तांत्रिक अनुमोदन देण्यासाठी लाच स्वीकारताना 26 मार्च रोजी दुरदुंडेश्वर बन्नूर याला अटक करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 7 (ए) 19888 (दुरुस्ती-2018) अन्वये त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्यानंतर अधिकाऱ्यांनी येळ्ळूर येथील दुरदुंडेश्वर बन्नूर याच्या निवासस्थानात तपासणी केली असता 27 लाख 75 हजार रुपये इतकी बेहिशेबी रक्कम व इतर किमती वस्तू आढळून आल्या आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us