*संगीत भजनी मंडळांना खुशखबर…
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
केंचापूर गल्ली खानापूर येथील जय भवानी युवक मंडळाच्या वतीने कार्तिक उत्सव निमित्त खुल्या संगीत भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 16 ते रविवार 17 असे दोन दिवस सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत केंचापूर गल्लीत ही स्पर्धा होणार आहे. भजनासाठी 18 मिनिटांचा वेळ आहे. विजेत्यांसाठी अनुक्रमे
पहिले 25 हजार, दुसरे 18 हजार, तिसरे 15 हजार, चौथे 12 हजार, पाचवे 10 हजार,
सहावे 8 हजार, सातवे 6 हजार,
आठवे 5 हजार, नववे 4 हजार,
दहावे 3 हजार, अकरावे 2100 रु. अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी संगम कुंभार (7795310047), केदार साळुंखे (9164975282) अभिषेक गावडे (7353493221) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.