खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
खानापूर श्री चौराशी देवी संगीत कला मंच खानापूर यांच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ” विठ्ठल नाद” खुल्या संगीत भजन स्पर्धांचे आयोजन येत्या 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी नऊ पासून दिवसभर करण्यात आले आहे.
खानापूर येथील लोकमान्य भवन सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर , माजी आमदार अरविंद पाटील, नगरसेवक नारायण मयेकर , शिवप्रतिष्ठान जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सर देसाई, खानापूर को ऑफ बँकेचे चेअरमन अमृत शेलार, जांबोटी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास बेळगावकर, खानापूर भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या संगीत भजन स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 7001, 5001, 3001, 2001,1001 अशी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तरी याचा भजन मंडळांनी लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9964737498, शी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.