खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकी वरून जाताना नियंत्रण सुटल्याने, दुचाकी रस्त्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील चालक ठार झाला पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाला असल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.आकाश अरुण गवाळकर (वय 23) याचा मृत्यू झाला तर शिवराज विनोद जाधव (वय 23) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदीहळ्ळी येथील एका लष्करी ट्रेनिंग अकॅडमी मध्ये मिलिटरीचे शिक्षण घेत होते. शनिवार रविवार असे दोन दिवस सुट्टी असल्याने ते दोघेही खानापूर तालुक्यातील मुंडवाड येथील आपल्या गावाकडे दुचाकीवरून जात होते. खानापूर लोंढा महामार्गावरील जोमतळे गावा नजीक दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, दुचाकी थेट रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात कोसळल्याने हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीचा चालक आकाश व शिवराज हे दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून खानापूर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र अपघातातील चालक आकाश याचा उपचाराविनाच वाटेतच मृत्यू झाला होता. तर शिवराज गंभीर दुखापत झाल्याने, पुढील उपचारासाठी त्याला बेळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या घटनेचा गुन्हा खानापूर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आला आहे. अपघातात मयत झालेल्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.