IMG_20240524_120333

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :

  • गुरुवारी खानापूर तालुक्यासह सर्वत्र झालेल्या वादळी पावसामुळे एकाचा बळी गेल्याची घटना खानापूर तालुक्यातील झुंजवाड (के एन) या ठिकाणी घडली आहे. सुसाट वारा व वादळी पावसामुळे एका घरातून दुसऱ्या घराला लाईट पेटवण्यासाठी घेण्यात आलेल्या विद्युत भारित तार एका लोखंडी पत्र्याला घर्षण झाल्याने त्या विद्युत भारीत प्रवाहमुळे त्या पत्र्याच्या निवाऱ्याखाली थांबलेल्या एका विवाहित युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पावलेल्या युवकाचे नाव मोहन (दीपक) नारायण पाटील (वय 38) रा. झुंजवाड के. एन. असे आहे.
  • याबाबत मिळालेली माहिती की, झुंजवाड के एन येथे श्री सुरेश पाटील यांच्या घरी नवीन बांधण्यात आलेल्या घराचा वास्तुशांती कार्यक्रम होता. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वास्तुशांती कार्यक्रम झाल्यानंतर जेवणावळी कार्यक्रमही पार पडला. दरम्यान स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेले सर्व भांडी साहित्य एका जवळच्या पत्र्याच्या शेड खाली ठेवण्यात आले होते. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने त्या शेड खाली काही मंडळीही उभा राहिली होती. त्या ठिकाणी लोखंडी पत्र्याच्या सेड जवळून सुरेश पाटील यांच्या घरातून लाईट पेटवण्यासाठी घेऊन गेलेली एक विद्युत तार होती. वादळी पावसामुळे लोखंडी पत्र्याचे विद्युत भारित तारेला पत्र्याचे घर्षण झाल्याने त्या विद्युतभारित तारेचा प्रवाह पत्र्याला लागला व त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांना हि त्या विद्युतभारित प्रवाहाचा झटका बसल्याचे समजते. त्याच ठिकाणी थांबलेले दीपक नारायण पाटील यांचा थेट त्या पत्राला स्पर्श झाल्याने ते बाजूला पडले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान गावातील अनेक मंडळीही त्या ठिकाणी उपस्थित होते. सुदैवाने आणखी पाच ते सहा जीव बालाबाल बसवल्याचे समजते.घडलेल्या प्रकाळामुळे अनेकांच्या धास्ती निर्माण झाली व त्यानंतर विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. तातडीने जखमी अवस्थेत दीपक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने घोषित केले. मयत दीपक पाटील यांच्यावर शुक्रवारी खानापूर तील शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी घर मालक सुरेश पाटील यांचा निष्काळजीपणाच त्याला जबाबदार असल्याची तक्रार दीपक पाटील यांच्या पत्नीने पोलिसात केली आहे त्याचा पोलीस तपास करत आहेत.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us