खानापूर लाईव्ह new/ गर्लगुंजी
शेतात कामाला गेलेला असताना पिण्यासाठी पाणी आणण्याकरिता विहिरीवर गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गर्लगुंजी (ता. खानापूर) येथे घडली. नागाप्पा गंगाराम बाबीचे (56) रा. चव्हाट गल्ली गर्लगुंजी असे शेतकऱ्याचे नाव आहे.
ते नेहमीप्रमाणे शेताकडे गेले होते. काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पिण्यासाठी पाणी आणायला विहिरीकडे गेले. हात पाय धुण्यासाठी खाली उतरले असताना पाय घसरून पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परत आले नसल्याने शेताकडे जाऊन पाहणी केल्यानंतर विहिरीच्या काठावर त्यांचे चप्पल दिसून आले. विहिरीत शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. खानापूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. सरकारी दवाखान्यात शवचिकित्सा करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.