खानापूर : खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 6 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत, सलग तीन दिवस, शांतीनिकेतन पब्लिक स्कूल पारिश्वाड रोड खानापूर, येथे, शाळेच्या पटांगणावर श्री महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संचलित लैला शुगर प्रा. ली. यांच्या वतीने भव्य कृषी मेळावा व शासकीय योजनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक. 6 जानेवारी 2025 रोजी, सकाळी, 10.00 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते कृषी मेळावा व शासकीय योजनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता, श्री महालक्ष्मी ग्रुप “गौरव पुरस्कार” वितरण सोहळा व शेतकऱ्याना मार्गदर्शन शिबिर होणार आहे. सायंकाळी 7.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, “जागर लोक संस्कृतिचा” होणार आहे.
मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 10.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते, आरोग्य शिबीराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुपारी 12.00 वाजता, उद्योग विषयक प्रबोधन होणार आहे. तर सायंकाळी 4.00 वाजता शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन “सृजन-2025” कार्यक्रम होणार आहे. शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी दुपारी तीन वाजता जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी, सकाळी 11.00 वाजता, शेतीतज्ञ व लघु उद्योग तज्ञाकडून, शेतकऱ्यांना ऊस पिकाबद्दल व लघु उद्योगांसाठी मार्गदर्शन शिबिर होणार आहे. तर दुपारी. 12.00 वाजता, समारोप व कृतज्ञता सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी, 4.00 वाजता शांतीनिकेतन पब्लिक स्कूलचे स्नेह संमेलन, “सृजन-2025” कार्यक्रम होणार आहे.
त्यासाठी, संस्थेचे सभासद, ग्राहक, शेतकरी व हितचिंतक बंधु व महिला वर्गाने, या मेळाव्याचा लाभ घेण्याची विनंती महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर च्या वतीने व आयोजकाकडून करण्यात आली आहे.