खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
बेळगाव येथे नुकताच झालेल्या विश्वभारती कर्नाटक यांच्यावतीने जिल्हास्तरीय सीनियर मुलांच्या अथलेटिक स्पर्धेत कु. ओमकार गावडू पाटील बरंगाव या विद्यार्थ्याने सुयश मिळवले आहे. ओमकार पाटील हा शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मध्ये शिकत आहे. त्याने या स्पर्धेत 100 मीटर धावणे, प्रथम क्रमांक 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक आणि फुटबॉल सांघिक खेळात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. याबद्दल ओमकार गावडु पाटिल यांचे अभिनंदन होत आहे
तसेच ओमकार याची बेंगलोर येथे ऍथलेटिक राज्यस्तरीय 100 मीटर धावणे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्याबद्दल शांतीनिकेतन शाळेचे प्राचार्य, शिक्षक व पालक व संस्थेच्या वतीने अभिनंदन होत आहे. ओमकार हा बरगाव ग्रामपंचायतचे क्लार्क गावडु पाटील यांचा चिरंजीव आहे. काव्य मंच पुणे शाखा, निपाणी विभागाचे जिल्हाध्यक्ष पिराजी पाटील (बरगाव ) यांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.