- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: अलीकडच्या शिक्षण पद्धतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असली तरी ग्रामीण भागातील शिक्षण पद्धत आजही तितक्याच ताकतीने उद्या घोषित विद्यार्थी घडवण्याचे काम करते एखाद्या शाळेची फी अधिक आहे म्हणजे तिथे जास्त शिक्षण मिळते असे उलट ज्या शाळेत कमी असते त्याच शाळेत उत्तम ज्ञानांकन करणारे शिक्षक अशा शाळांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन उच्च विद्यापीठ व्हावे असे विचारखास विजया ऑर्थोची संस्थापक डॉक्टर रवी पाटील प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
- दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू हायस्कूल ओलमनीचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला आणि विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार सोहळ्याने साकार झाला. यावेळी हे उद्घाटक या नात्याने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष तुकाराम साबळे होते.
- कार्यक्रमासाठी खानापूर पोलीस स्टेशनचे सीपीआय मंजुनाथ नाईक यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सी एस कदम यांनी केले. या कार्यक्रमाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कलाविष्काराने सर्वांचे मंत्रमुग्ध असे मनोरंजन केले या कार्यक्रमाला वडगाव, ओतोळी, दारोळी,कालमनी व ओलमणी या गावातील रसिक स्त्रोत्यांनी पुरा क्रीडांगण व्यापला होता. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ विशेष करून माजी विद्यार्थी व तरुण वर्गाने सहकार्य केले. सीपीआय मंजुनाथ नाईक म्हणाले, ग्रामीण भागात सुद्धा असे कार्यक्रम होतात याबद्दल भरभरून दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सीपीआय मंजुनाथ नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ रवी पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अजित सावंत यांनी केले. तर आभार एस. आय. काकतकर यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग तसेच शाळा सुधारणा कमिटीने सहकार्य केले विशेषतः गावातील तरुण युवकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य व साथ दिली.