IMG_20240107_185114
  • खानापूर: 16 जानेवारी रोजी भाषावार प्रांतरचनेची घोषणा झाली आणि मराठी बहुल भाग तत्कालीन मैसूर प्रांतात डांबण्यात आला. त्याच्या विरोधात 17 जानेवारी 1956 रोजी मराठी भाषिक रस्त्यावर उतरले व मोठा जनक्षोभ उसळला. त्यावेळी झालेल्या पोलिसांच्या बेछूट गोळीबारात सीमा भागातील अनेकांना बलिदान प्राप्त झाले. 17 जानेवारी रोजी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आणि मराठी भाषिकांनी खानापूर येथील हुतात्मा स्मारक स्टेशन रोड येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
  • त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या कन्नड सक्ती विरोधात दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता बेळगाव जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे या निर्णयाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पाठिंबा व्यक्त केला त्याचप्रमाणे भविष्यात मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणार आहेत त्याला देखील खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला पाठिंबा व्यक्त केला
  • राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी खानापूर तालुक्यातील हुतात्मा कै.नागाप्पा होसुरकर यांना अभिवादन करण्यासाठी मराठी भाषिकांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले तसेच कर्नाटक सरकारकडून कन्नड फलकांसाठी सुरू असलेल्या शक्तीविरोधात आवाज उठविण्यात आला कर्नाटक सरकारकडून असेच धोरण अवलंबल्यास मराठी भाषिकांनी एकजुटीने आपली ताकद दाखवून देणे गरजेचे आहे जिल्हा प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा सुरू असलेल्या कन्नड सक्ती विरोधात मराठी भाषिकानी भविष्यात तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे असे मत कार्यकर्त्यांनी उपस्थित केले.त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आला आहे त्यासाठी सीमा भागातील रुग्णांना मदत मिळणार आहे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक रुग्णांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांच्याशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या भागातील लोकांना सदर योजनेची मदत मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले आहे यावेळी बैठकीला माजी आमदार दिगंबरराव पाटील,सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई,माजी सभापती मारुतीराव परमेकर, खजिनदार संजीव पाटील म.ए. समितीचे सदस्य प्रकाश चव्हाण, गोपाळराव पाटील, रणजीत पाटील ब्रम्हानंद पाटील शिवाजी पाटील, गोपाळ हेब्बळकर.राजेश अंद्रादे,राजाराम देसाई अमृत शेलार डीएम भोसले कृष्णा कुंभार सीमा सत्याग्रही शंकरराव पाटील रामचंद्र गावकर विठ्ठल गुरव जानबा वारके कृष्णा मनोरकर कृष्णराव राणे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात बोलताना गोपाळराव देसाई म्हणाले की 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा व मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथे खानापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले बैठकीचे प्रास्ताविक आणि आभार सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी मानले
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us