खानापूर : तालुक्यातील मनतुर्गे गावातील रोजगाराच्या महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोष्टमन सुराप्पा पाटील यांचे घरी एक छोटेखानी बैठक घेतली.
मजदूर नवानिर्माण संघाच्या वतीने रोजगाराला (मनरेगा) जाणाऱ्या महिलांना त्याच्या समस्या मांडण्यासाठी एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे हे सांगितले व पुढील काळात पुन्हा एकदा सर्व मनतुर्गे गावातील कामगारांची बैठक मजदूर नवानिर्माण संघाच्या माध्यमातून घेऊन मनरेगा कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन राहुल पाटील यांनी दिले.
तसेच येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी ‘आॕपरेशन मदत’ ग्रूपच्या वतीने ग्रामीण शिक्षण अभियानाअंतर्गत शैक्षणिक साहित्याची मदत करू ही ग्वाही दीली. यावेळी विद्यार्थीनींनी गाणे गाऊन पाहुण्यांचे शब्दसुमनांने स्वागत केले, आरती पाटील, मोहन पाटील, गावातील महिला वर्ग व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.