Home » वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन

वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन

IMG-20260917-WA0027

पेन्शन बंद झाल्याने २१ हजारांहून अधिक लाभार्थी संकटात; तातडीने सर्वेक्षणाची मागणी

वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन

खानापूर : खानापूर तालुक्यात महसूल विभागाकडून २१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) स्थगित करण्यात आल्याने वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तांत्रिक त्रुटी, कागदपत्रांची पडताळणी अथवा अन्य कारणांमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्याप पेन्शन मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पेन्शन बंद झाल्यामुळे नियमित उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्या वृद्ध व दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विधवा महिलांचीही आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर खानापूरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे विनंती पत्र देण्यात आले आहे. तालुक्यातील स्थगित पेन्शन प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी ग्राम लेखापाल, महसूल निरीक्षक आणि नायब तहसीलदार यांना योग्य सर्वेक्षणाचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा अहवाल तयार करून ज्यांची पेन्शन तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे थांबली आहे, त्यांची पेन्शन तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कोणताही पात्र व गरजू लाभार्थी प्रशासकीय प्रक्रियेमुळे लाभापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती बेळगावचे उपायुक्त तथा जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन, कर्नाटकचे महसूल मंत्री जी. परमेश्वर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Do Share

You may have missed

error: Content is protected !!
Call Us