खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर सहशिष्ट मंडळाचे मंत्र्यांना निवेदन
बेंगलोर / प्रतिनिधी :खानापूर तालुक्यातील बहुतांश रस्ते विकासाभावी वंचित आहेत. खानापूर तालुक्यातील एकूण सात राज्य मार्ग प्रारंभ होतात.यापैकी मुख्य राज्यमार्ग असलेला खानापूर- तालगुपा या रस्त्याचा देखील खानापुरातून शुभारंभ होतो या रस्त्यापैकी खानापूर ते लिंगनमठ पर्यंतचा 30 किमी राजमार्ग खानापूर तालुक्यातून जातो. या मार्गावर वाहतूकही मोठी असून अनेक प्रमुख गावांशी जोडला गेला आहे. याकरिता या मार्गाच्या भक्कम विकासासाठी हा राज्यमार्ग महामार्ग प्राधिकरण विभागाशी संलग्न करून या रस्त्याचा विकास करण्यात यावा अशी मागणी खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर सहशिष्टमंडळाने बेंगलोर येथे कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शुक्रवारी सकाळी मंत्री जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या समवेत लैला कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संचालक चांगाप्पा निलजकर, माझी ताप असत श्रीकांत इटगी, बसवराज सानिकोप, ॲड. सुरेश भोसले, श्याम घाडगे,सुनील मढीमणी आधी होते.
तालुक्यातील 24 ग्रामीण रस्त्यासाठी 72 कोटी निधी मंजूर करा:
खानापूर तालुका हा दुर्गम भागाने विस्तारला तालुका आहे अनेक रस्ते विकासाभावी वंचित असून यापैकी जवळपास 30 हून अधिक रस्ते सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत येतात. यापैकी प्रामुख्याने 24 रस्ते पूर्णतः नादुरुस्त आहेत. यामुळे खानापूर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अडचणीत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत येणाऱ्या या प्रमुख रस्त्यांसाठी जवळपास 72 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे. यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्प मध्ये खानापूर तालुक्यातल्या या ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करून मंजुरी द्यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी मंत्री जारकीहोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून खानापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची समस्या आपल्याला माहित असून या रस्त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.