सुवातवाडी:
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते निरंजन उदयसिंह सरदेसाई यांनी नागरगाळी ग्रामपंचायत क्षेत्रातील सुवातवाडी या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सुवातवाडी येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा व वार्षिक उत्सव कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने समिती नेते निरंजन सरदेसाई यांनी भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली.
यावेळी खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समिती प्रबळ झाली असून एकीच्या झेंड्याखाली कार्य करत असताना मराठी माणसांनी ही एकत्रित येऊन समितीच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी समितीच्या पाठीशी उभ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी समिती नेते आबासाहेब दळवी यांनीही त्यांच्या सभेत उपस्थित राहून समितीच्या ध्येयधोरणाविषयी व मराठी भाषा व संस्कृती विषयी मार्गदर्शन केले . याप्रसंगी सूवातवाडी गांवचे नागरीक श्री. रामचंद्र मिराशी व अन्य ग्रामस्थ तसेच अनेक महिला व भक्तगण उपस्थित होते. या सर्वांनी आम्ही समितीच्या पाठीशी कायम आहोत असे मत मांडले.