खानापूर : खानापूर तालुक्यात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. खानापुरात भाजप काँग्रेस व समिती तसेच निजद अशी चौरंगी लढत कोणाची शक्यता नाकारता येत नाही. भाजप समितीत इच्छुकांची संख्या अधिक असली तरी खानापूर तालुका काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आल्याने डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या प्रचार कार्यालाही प्रारंभ केला आहे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी खानापूर येथील चौरासी देवी व कक्केरी येथील येथील बिष्टंमा देवी मंदिराला पूजा करून आपल्या प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. स्वतःच्या वाहनाला “काँग्रेस सात सबका विकास” अशी हाक देत सर्व दैवतांच्या दर्शनानंतर प्रचार कामाला सुरुवात केली आहे.
आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्वतःच्या वाहनालाच प्रचार वाहन करून रंगकाम केले आहे. समवेत दररोज 30 ते 40 कार्यकर्ते त्यांच्या प्रचार कामात व्यस्त झाले असून गावागावात भेटींना प्रारंभ केला आहे. निवडणुकीला अजून 40 दिवस आहेत याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपली अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला जोर लावला आहे.