- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- तालुक्यातील निडगल येथील श्री हनुमान मंदिर व बलभीम व्यायाम मंदिर जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने शनिवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी मोठा गट तसेच मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी लहान गट अशा दोन गटात जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शर्यत सम्राट शाहू कदम राहणार आहेत.
- या शर्यतीत मोठ्या गटाकरिता अनुक्रमे 25000,20000,17000,15000,12000,अशी 21 बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
- तर लहान गटात 11000,9000,7000,6000 अशी पंधरा पक्षीचे ठेवण्यात आली आहे.
- शर्यतीत भाग घेऊन येणाऱ्या बैलजोडी मालकांनी अधिक माहितीसाठी 9845643022, किंव्हा 9901473633 श्री संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.