IMG-20230822-WA0137

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी :

गाव,करी ते राव न करी, या उक्तीप्रमाणे गावात सार्वजनिक रित्या एखादे काम हाती घेतल्यास ते परिपक्व करण्यासाठी गावकऱ्यात असलेली एकी ही एक विकासाचे प्रतीक बनते. गावातील एखाद्या मंदिराचे बांधकाम असो किंवा एखाद्या सार्वजनिक कामाचा पायंडा असो. तो काम करण्यासाठी पारदर्शकता आणि विश्वासाहतता ही फार महत्त्वाची ठरते याच अनुषंगाने निडगल गावात श्री हनुमान व बलभीम वाया मंदिराच्या उभारणी ग्रामस्थांनी राखलेली एकी ही एक बलभीमाची ताकदच म्हणावी लागेल असे गौरव उद्गार माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. मंगळवारी तालुक्यातील निडगल येथे श्री हनुमान मंदिर व बलभीम व्यायाम मंदिर स्लॅब भरणी कार्यक्रम‌ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना लैल्ला साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक व भाजप नेते सदानंद पाटील म्हणाले, तालुक्यातील तमाम नागरिकांनी निडगल गावातील जेष्ठ नागरिकांच्या आदर्शाचे अनुकरण व या ठिकाणी आजच्या युवापडी करून देण्यात येणारा मान सन्मान हा आदरणीय आहे. हेच संस्कार भावी पिढीला ही मिळणे काराची गरज आहे. आजची पिढी व्यसनाधीनते कडे जाताना दिसतेय. धर्म रीती रिवाज परंपरा याची जाण नवीन पिढीला नाही, यासाठी वडिलार्जीत आलेल्यानी परंपरेला उभारी देण्यासाठी असे कार्यक्रम घडवून नवीन पिढीलाही आदर्शवत बनवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे विचार व्यक्त केले तसेच आमदार विठ्ठल हलगेकर हे तेलंगणा दौऱ्यावर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत आपणाला येऊन तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी प्रेरित केले असल्याचे विचार यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खानापूर कृषीपतींचे अध्यक्ष नारायण कार्वेकर, माऊली एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक जयसिंग पाटील, भाजपा तालुका रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तीराविर, खानापूर कृषी पती संघाचे संचालक शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण तिरवीर, बरगाव ग्रामपंचायत अध्यक्ष सौ, चांगुणा पाटील, व इतर नेते मंडळी, गावातील नागरिक उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us