खानापूर / प्रतिनिधी; खानापूर तालुक्यातील नंदगड उत्तर प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल भरघोस मतांनी निवडून आले आहे. या कृषिपतीने सहकारी संघाच्या बारा जागा करिता निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
पाच जागाकरिता झाली निवडणूक
या कृषी पतीन सहकारी संघाची 5 सामान्य जागाकरिता चुरशीची निवडणूक झाली.सदर पाच जागाही बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार अरविंद पाटील यांनी अथक परिश्रम घेतले होते. पण रुकमाना शंकर झुंजवाडकर यांनी उमेदवारी अर्ज माघार न घेतल्यामुळे चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण 421 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये कल्लाप्पा आनंद मडवाळकर यांनी 288 महाबळेश्वर परसराम कोलेकर 285, वीरेश वाली 284, शंकर भैरू बस्तवाडकर 288, हनुमंत मु नाईक 280 मते घेऊन निवडून आले. तर रुकमाना शंकर जुंजवाडकर यांना 119 मध्ये मिळाल्याने ते पराभूत झाले.
सात जागा बिनविरोध
माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये महिला गटातून दिव्या दुर्गापा पाटील, ब’ वर्ग गटातून जयवंत निंगाप्पा खानापूरकर, बिन कर्जदार’ गटातून कल्लाप्पा परशराम बावकर , सामान्य महीला गटातून लक्ष्मी रुद्रप्पा हिंडोरी अनुसूचित जमाती गटातून’ दुर्गाप्पा लक्ष्मण तळवार , अनुसूचित जाती गटातून’ रामचंद्र शंकर मादार, तर अ वर्ग’ गटातून महांतेश ईश्वर मुतगी यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.