IMG-20230627-WA0066

खानापूर / प्रतिनिधी; खानापूर तालुक्यातील नंदगड उत्तर प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी कल्लाप्पा मडवाळकर (हडलगा) यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मी हिंडोरी (बंकीबसरीकट्टी) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या संचालक मंडळाचा पुढील पंचवार्षिक कालावधीसाठी बहुमताने निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी उपस्थतांचे स्वागत केले.

यावेळी नवनिर्वाचित संचालक महाबळेश्वर परशराम कोलेकर ,वीरेश वाली, शंकर भैरू बस्तवाडकर, हनुमंत मु नाईक, सौ. दिव्या दुर्गापा पाटील, जयवंत निंगाप्पा खानापूरकर, कल्लाप्पा परशराम बावकर, दुर्गाप्पा लक्ष्मण तळवार, रामचंद्र शंकर मादार, महांतेश ईश्वर मुतगी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यात सहकारी संस्था पारदर्शकरित्या चालण्यासाठी संचालक मंडळ ही तितकेच कार्यतत्पर व प्रामाणिक असणे आवश्यक आहे. या कृषिपतीन सहकारी संघावर अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणीही असले तरी काम मात्र सर्वांनी मिळून करायचे आहे. यासाठी नंदगड उत्तर कृषीपतींवर विद्यमान संचालक मंडळापैकी निवडून देण्यात आलेल्या सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष यानी काम करावे व संस्थेची भरभराट करावी असे आवाहन केले. यावेळी उपस्थित संचालकानी उभयतांचे अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कल्लाप्पा मडवालकर यांनी सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी आपण कार्यतत्पर राहू असे आश्वासन दिले. संस्थेचे सचिव यांनी आभार मानले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us