नंदगड:: नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लिंगनमठ जवळ हल्ल्याळ कडून कक्केरीकडे येणाऱ्या एका मारुती कंपनीच्या वेठ्राकार मधून अवैधरित्या जवळपास 40 लाखाचा सोन्या-चांदीचा ऐवज घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.
दि. 4 रोजी दुपारी 12 च्या सुमारास हल्ल्याळ भागातून कक्केरीकडे एका वाहनातून अवैधरित्या सोने व चांदी घेऊन जात असल्याची माहिती नंदगड पोलिसांना मिळाली. पोलीसांनी सापळा रचून लिंगनमट जवळ सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जवळपास 40.33,720 लाखाच्या सोन्या चांदीचा ऐवज आढळून आला. सदर सोने-चांदीची कोणत्याही प्रकारे खरेदी विक्री केल्याची पावती नसल्याने ती अवैध वाहतूक असल्याचे निदर्शनाला आले. व याप्रकरणी हल्ल्याळ येथील धर्मराज हनुमंत कुट्रे यांची जवळपास 13 लाख किमतीची महिंद्रा वेट्रा कार जप्त करून मुद्देमालासह त्या व्यक्तीवर कारवाई केली आहे.
यासंदर्भात बैलहोंगल पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार नंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक बसवराज लमानी, कर्मचारी बेळवडी सह पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. त्याच्यावर कलम 98 कर्नाटक पोलीस अधिनियम 1963 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास जाहीर केला आहे.