- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबिराला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद.. एनसीसी दिनाचे औचित्य साधून मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने रक्तदान शिबिरात भाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जे के बागेवाडी होत्या.
- मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक संयोजक या नात्याने एनसीसी अधिकारी डॉ. आय एम गुरव यांनी केले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर जे के बागेवाडी म्हणाल्या, रक्तदानाचे आजच्या काळातील महत्व.. त्यात तरुण पिढीची भूमिका यासंदर्भात विचार व्यक्त केले. उद्घाटन सत्रात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विठ्ठल माने, के एल ई, रक्त संकलन शाखेचे प्रमुख उपस्थित होते. ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की, “रक्तदानाचे महत्त्व खूप मोठे आहे. एका व्यक्तीने जर रक्तदान केले तर वेळप्रसंगी तीन लोकांचा जीव वाचू शकतो. शिवाय रक्तदान केल्याने मानवी शरीराला खूप फायदे आहेत. रक्तदान नियमित केल्याने कोणतेही आजार आपल्या शरीरा जवळ येत नाहीत. त्यामुळे कोणताही संकोच न बाळगता तरुणांनी रक्तदान करावे” असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते विनायक मुतगेकर , पत्रकार वासुदेव चौगुले, एचडीएफसी खानापूरच्या नूतन शाखेचे मॅनेजर फिरोज नवलुर इत्यादींची रक्तदानाच्या संदर्भात मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संतोषी गुरव, हिने केले. तर आभार कु. माहेश्वरी नांदुडकर ने मांडले.
- अन केला… रक्तदानाचा संकल्प!
- कु. वैभव विनायक मुतगेकर या तरुणाला दरवर्षी पुरेल इतके रक्तदान करण्याचा महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा संकल्प यावेळी घेण्यात आला.कु. वैभव मुतगेकर या तरुणाच्या शरीरात लाल पेशी तयार होत नाहीत. त्यामुळे तो पाच महिन्याचा असल्यापासून त्याच्या आई-वडिलांनी दर पंधरा दिवसाला विविध रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेऊन त्याला जीवदान दिले आहे. मराठा मंडळ महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने दरवर्षी त्याला पुरेल इतके रक्तदान करण्याचा संकल्प केल्याने त्या मुलाच्या आई-वडील व त्या तरुणाला मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीसी विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.