खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- श्री गणेश फेस्टीवल बेळगांव 2023, यांच्या वतीने देण्यात येणारा नवरत्न पुरस्कारातील नाट्य भूषण पुरस्कार 2023 हा खानापूर येथील लोककलावंत शाहीर श्री अभिजीत द, कालेकर यांना देवून गौरविण्यात आले, सन्मान चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून विविध क्षेत्रातील नऊ मान्यवरांचा विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले,
- बेळगाव येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्रीमाता सोसायटी, श्रीभक्ती महिला सोसायटी, श्री राजमाता महिला सोसायटी, श्री समर्थ अर्बन सोसायटी, व ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार श्री गणेश फेस्टीवल मध्ये प्रदान करण्यात येतात, त्यामध्ये खानापूरचे लोककलावंत अभिजीत कालेकर यांची निवड करण्यात आली होती. त्यांचा संयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी श्री गणेश फेस्टीवलचे अध्यक्ष श्री मनोहर देसाई, श्री अभिजीत चव्हाण, यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच लोक संस्कृती नाट्य संस्थेचे श्री नागेश बोबाटे, श्री सूरज पाटील, हे उपस्थित होते,