FB_IMG_1772524838329

खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी : मागील ६ महिन्यांपासून बंद असलेला खानापूर शहरांतर्गत जाणारा शिवस्मारकचौक ते करंबळ क्रॉस (फिश मार्केट जवळ) हा महत्त्वाचा रस्ता आजपासून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही वादाशिवाय केवळ शेतकऱ्यांच्या सकारात्मक सहमतीने आणि सामंजस्याने हा तिढा सुटला आहे..

शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी दिलेल्या जमिनीबद्दल त्यांना शासनाच्या वतीने योग्य आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण पूर्णतः सहकार्य येणाऱ्या काळात करू, असे आश्वासन आमदार हलगेकर यांनी यावेळी दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे..

आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून रस्त्यासाठी जागा देणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनापासून कौतुक केले. सार्वजनिक हिताचा आणि ग्रामीण जनतेच्या सोयीचा विचार करून शेतकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सांगितले.

शहरांतर्गत महामार्ग विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले 14 कोटीचा निधी मंजूर झाला कामही सुरू झाले परंतु काम सुरू झाल्यानंतर मासळी मार्केट जवळ मोरीचे काम सुरू असताना संबंधित शेतकरी मालकांनी आपल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी सरकार दरबारी दाद मागितली. या कामी आमदारानी संबंधित शेतकऱ्यांना शासन दरबारी आणून त्यांना अधिक मोबदला देण्यासंदर्भात प्रयत्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी सकारात्मक पाऊल उचलून आमदारांच्या भूमिकेला सहकार्य केले आहे. गेल्या सहा महिन्यापासून रस्ता बंद असल्याने शाळकरी मुलांना मोठा वळसा घालून जावे लागत होते, आता त्यांचा त्रास वाचणार आहे. व तसेच खानापूर शहरातील हा प्रमुख रस्ता असल्याने गेल्या ६ महिन्यांपासून दुकानदार आणि व्यावसायिकांच्या गल्ल्यावर परिणाम झाला होता. रस्ता सुरू झाल्याने बाजारपेठेत पुन्हा चैतन्य येईल.

“शेतकऱ्यांनी दाखवलेल्या सामंजस्यामुळे खानापूरच्या ग्रामीण भागातील जनतेचा एक मोठा प्रश्नमार्गी लागला आहे. हा रस्ता म्हणजे खानापूरच्या विकासाची महत्त्वाची वाहिनी आहे.”
— आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर..

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us