खानापूर लाईव्ह न्यूज /प्रतिनिधि:
नंजिनकोडल-दोड्डेबैल संपर्क रस्ता खचल्याने या मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शेतवडीतील मोरीच्या पुलाला भगदाड पडले होते. ग्राम पंचायतीने मुरुम टाकून तात्पुरती दुरुस्ती केली होती. पण, मंगळवारी (दि. १३) आज बाजू पट्ट्यांसह रस्ताच खचल्याने दोन्ही गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. काल पासुन या मार्गांवरील पडलेले हे भगदाड अपघाताला आमंत्रण ठरले आहे. बुधवारी सकाळी एक सायकल चालक वृध्द त्या भगदाड मध्ये पडल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे.
डांबरीकरणानंतर अवघ्या दोनच महिन्यात दोन ठिकाणी भगदाड पडले. पाच फूट खोल खड्डा पडून रस्ताच खचला आहे. अखत्यारीतील या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिवारातील पाणी खाली जाण्यासाठी या इस्त्यावर पाईप टाकून मोरी आली आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्याने या मोरीवरील रस्ता खचला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व प्रकारची रहदारी ठप्प झाली आहे. दोबैल ग्रामस्थांना ग्राम पंचायत कार्यालयासह इतर कामांसाठी रोज नंजिनकोडलला जावे लागते. अनेक शेतकऱ्यांची या बाजूला शेती आहे. रस्ता खवून सायकल जाण्याएवबीही जागा शिल्लक नसल्याने ऐन गणेशोत्सवात मोठे विघ्न निर्माण झाले.ग्राम पंचायत कार्यालयासह इतर कामांसाठी रोज नंजिनकोडल जावे लागते. अनेक शेतकऱ्यांची या बाजूला शेती आहे. रस्ता खवून सायकल जाण्याएवडीही जागा शिल्लक नसल्याने ऐन गणेशोत्सवात मोठे विघ्न निर्माण झाले आहे.