खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी: नंदगड येथील स्वयंभू श्री दुर्गादेवी मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही स्वयंभू दुर्गादेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा कार्यक्रम येथील व्यवस्थापन मंडळाने हाती घेतला आहे. गुरुवार दिनांक 3 ऑक्टोंबर घटस्थापनेपासून मंगळवार दिनांक 12 ऑक्टोंबर विजयादशमी दसऱ्यापर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या उत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत विविध धार्मिक विधी पूजाअर्चा भजन नामस्मरण याबरोबर परिसरातील गावांचा भजनी मंडळाचा जागर कार्यक्रम असे विविध कार्यक्रम सतत नऊ दिवस आयोजित करण्यात आले आहेत.