IMG-20230806-WA0110

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
खानापूर तालुक्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलेल्या नंदगडचा भारतीय नौदलातील सैनिक रचित शिवानंद तुरमुरी यांनी गेल्या 14 जुलै रोजी झालेल्या फ्रान्समध्ये झालेल्या’ बास्टेल डे’ परेडमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कार्य केले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याप्रसंगी कु.रचित परेड दौऱ्यात निवड झाल्याने अग्रेसर होते. कु. रचित तुरमुरी याने यापूर्वीही दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या 2022 तसेच_2023 च्या प्रजासत्ताक दिनातील प्रयोगमध्येही भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘बास्केट डे ‘ परेडमध्ये त्याने भाग घेऊन केवळ नंदगडचेच नाव नव्हे तर संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे नाव नावारूपास आणले आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर कबड्डीतही भाग घेऊन दोन वेळा पदक व प्रशस्ती मिळवली आहे.

आपल्या दोन वर्षांच्या सेवेत कु. रचेत शिवानंद तुरमरी यांनी सलग दोन वेळा दिल्ली परेडमध्ये भाग घेतला आणि प्रथम क्रमांक मिळवून पदके व पुरस्कार मिळवले तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फ्रान्स येथे झालेल्या बॅस्टिल डे परेडमध्येही पुरस्कार मिळवला आणि कु. रचेत राष्ट्रीय परेडचे मानकरी ठरले. त्याच्या या सेवेची दखल घेऊन त्याचे यापूर्वी अभिनंदन करण्यात आले. कु. रचित दोन दिवसांपूर्वी आपल्या नंदगड गावी सुट्टीवर परतला आहे. तो आल्याची बातमी कळतात खानापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व माजी आमदार अरविंद पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना अभिनंदन केले व त्यांचा श्रीफळ शाळा देऊन सत्कार केला त्यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य पुंडलिक कारलगेकर तसेच गावातील काही ज्येष्ठ मंडळी व त्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us