- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधि: घटस्थापनेचा संबंध हा थेट शेतकऱ्यांशी येतो. घटस्थापना म्हणजे बीजपरीक्षण होय. आपल्या शेतात आपण जी पिके पिकवतो, आणि ज्यातून आपले पोट भरते त्याप्रति श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नवरात्र. नवरात्रीच्या दरम्याने शेतातील पिके तयार झालेली असतात तर काहींच्या पिकांची कापणी झालेली असते. आपल्या घरामध्ये नवीन धान्य आलेले असते. घटस्थापनेच्यावेळी घटासमोर आपण आपल्या शेतातील माती आणतो. त्या मातीमध्ये हे नवीन धान्य आपण पेरतो. दसऱ्यापर्यंत म्हणजे नऊ दिवसात ते धान्य त्या घटासमोर उगवते. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही आपल्याकडून पूजा केली जाते. म्हणून या नवरात्रोत्सव दसऱ्यानंतर सुविचार हंगामाने खऱ्या अर्थाने सुरुवात होते यासाठी हिंदू धर्म परंपरेत या सणाला विशेष महत्त्व असते. असे विचार निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केले. सोमवारी खानापूर तालुक्यातील नागुर्डा येथे दुर्गादेवी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित सन्मान कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
- श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव कमिटी नागुर्डा यांच्या वतीने सालाबादप्रमाणे 15 रोजी दुर्गामाताची प्रतिष्ठाना करण्यात आली. सोमवारी रोजी श्रीमंत सरकार श्री निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सव प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोपाळराव देसाई अध्यक्ष म ए समिती खानापूर, मुरलीधर पाटील कार्याध्यक्ष म ए समिती, आबासाहेब दळवी सरचिटणीस म ए समिती, बसवराज होंदडकट्टी उद्योजक खानापूर, अशोक पाटील संचालक पीकेपीएस खानापूर, ज्योतिबा खांबले प्रगतशील शेतकरी नागुर्डा, बाळू बिर्जे, नारायण महाजन, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, कुमार थंगम, पंडित ओगले, प्रवीण सायनाक पीडीओ, सौ पूजा चाळगुंडे चेअरमन ग्रामपंचायत नागुर्डा, कृष्णाजी पाटील, मनोहर सुळेभावीकर, लक्ष्मण नांदुरकर, मुकुंद कांबळे, रमेश मादार, मनोहर बरुकर, दत्ताजी महाजन, मारूती धारवाडकर, राघोबा चापगावकर, दुर्गाप्पा महाजन इत्यादींच्या हस्ते विविध देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
- प्रारंभी ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रास्ताविक केले, उपस्थितांचे स्वागत परशराम महाजन, विनायक पाटील, विजय चापगावकर यांनी केले. यावेळी कु सोनाली ज्ञानेश्वर पाटील नागुर्डा हिने दहावी परीक्षेत ९८.४०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम तसेच मारूती धारवाडकर सेवानिवृत्त जवान, नागेश पाटील, शिवानंद धारवाडकर व सहदेव महाजन या भारतीय सैन्यातील सध्या सेवेत असलेल्या जवानांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांची दुर्गामाता नवरात्रोत्सव निमित्त भाषणे झाली. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी नागुर्डा ग्रामपंचायत क्षेत्रातील बहूसंख्य नागरिक उपस्थित होते.