
नंदगड : येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव संचालित डी एम एस पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी वार्षिक परीक्षा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये वाणिज्य विभागातून स्नेहा येळूरकर 547 गुण (91.16%) घेऊन महाविद्यालयात प्रथम आली आहे. वैष्णवी नजीनकोड 504 गुण (84%)घेऊन महाविद्यालयात द्वितीय आली आहे. अदिती बेळगांवकर 493गुण (82.16%) घेऊन तृतीय आली आहे.स्वरा गुरव 458 गुण (76.33) घेऊन चौथी आली आहे. ऐश्वर्या शिवणगेकर 425 गुण (70.33%) घेऊन पाचवी आली आहे.
कला विभागातून साक्षी खानापूरकर 384 गुण (64%)घेऊन कला विभागात प्रथम आली आहे. माधुरी मडवळकर 326 गुण (54.33%)कला विभागातून दुसरी आली आहे.
या विध्यार्थीना व्यवस्थापन मंडळ, प्राचार्या, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आहे..