२० वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन; ग्रंथदिंडी मार्गावर भगवामय वातावरण
खानापूर, ता. २२ : ‘शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन, खानापूर’ व ‘गुंफण साहित्य अकादमी’तर्फे आयोजित करण्यात आलेले ‘२० वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन’ साहित्यप्रेमींच्या उत्साहात पार पडले. खानापूर येथील लोकमान्य भवन येथे रविवारी (ता.२२) झालेल्या कार्यक्रमाला मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रविवारी सकाळी ज्ञानेश्वर मंदिर येथून ग्रंथ दिंडीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रंथ दिंडीच्या मार्गावर भगव्या पताका व भगवे ध्वज, रांगोळ्यांचा सडा, वारकरी संप्रदायाचे भजन आणि बाल कलाकारांनी हातात घेतलेले संदेश फलकअशा उत्साही वातावरणात ग्रंथदिंडी निघाली. हुतात्मा स्मारकाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दिंडी उदयसिंह सरदेसाई साहित्य नगरीत दाखल झाली.
साहित्यनगरीचे उद्घाटन मालोजी अष्टेकर, विलास बेळगावकर, रमाकांत कोंडुसकर, रंगनाथ पठारे, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मनोहर माळगावकर व्यासपीठ व द. गो. सडेकर ग्रंथ दालनाचे उद्घाटन केले. दिवसभर मायमराठीच्या उत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्यरसिकांनी घेता आली. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनातप्रमुख पाहणेबबन पोतदार, कवयित्री चित्रा क्षीरसागर उपस्थित होते.
गोव्यातील कवयित्री रजनी रायकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांच्या कवी संमेलनात डॉ. चंद्रकांत पोतदार, चित्रा क्षीरसागर, रामचंद्र कांबळे, कृष्णा पारवाडकर, प्रकाश क्षीरसागर, महादेव खोत, चंद्रशेखर गावस स्मिता किल्लेदार, स्वाती बाजारे, सु. ना. गावडे, लहराज दरेकर, अमृत पाटील, कविता फडके, गुरुनाथकिल्लेकर यात्ती कविता सादर केली.
‘आजच्या पत्रकारिते पुढील आव्हाने या परिसंवादात अध्यक्ष विलास अध्यापक, अनिल आजगावकर, वासुदेव चौगुले, राजू मुळ्ये व प्रसाद प्रभू यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी गोपाळ देसाई, बाबुराव पाटील, ईश्वर घाडी, नारायण कपोलकर, अरुण सरदेसाई, संभाजी देसाई, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, दत्तू कुट्टे, केशव कळ्ळेकर, जयंत तिनेकर, अंकुश केसरकर, अमृत शेलार, राजाराम देसाई, भैरू पाटील, दत्ता बेळगावकर, डॉ. बसवेश्वर चेनगे, बबन पोतदार, गजानन चेणगे, गुणवंत पाटील, रमेश धाबले, मुकुंद पाटील, रणजित पाटील, मिलिंद देसाई, नागेश भोसले, विनोद पाटील, बाबुराव पाटील, दीपक टिक्केकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गुंफण पुरस्कारांचे वितरण
साहित्य संमेलनात साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दलअकादमीच्यावतीने देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर गावस, एल. डी. पाटील, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक आणि प्रकाश बेळगोजी यांना मानचिन्ह, प्रशस्ती पत्र व शाल देण्यात आली. वैष्णवी हलगेकर, वीरेंद्र पत्की, मोहन रावळ राजू मोरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
संमेलनात रंगली तबला जुगलबंदी
■ संगीत विशारद मष्णू चोर्लेकर व सतीश गच्ची यांच्यातील जवळपास अर्ध्या तासाच्या तबला जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध होऊन गेले. त्यांना विश्वनाथ अगसगे यांनी हार्मोनियम साथ दिली.