
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
पाश्चात संगीत आणि आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या अभंग रचनेतील संगीतातील फरक हा फार वेगळा आहे. नामस्मरणातील संगीत मनाला प्रफुल्लित करणारा आहे. म्हणून पंढरीच्या विठ्ठलाच्या नावातील संगीताचा नाद हा प्रत्येकाच्या मनाला शांती आणि समाधान देणारा ठरतो असे विचार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले. खानापूर येथे श्री चौरासी देवी संगीत कला मंच यांच्या वतीने मकर संक्रांतीचे अवचित साधून खानापुरातील लोकमानभावनात आयोजित श्री विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धेत उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बाळासाहेब महादेव शेलार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर पुढे म्हणाले, पाश्चात संगीत हे मनाला विचलित करणारी ठरतात. भारतीय संस्कृतीत संगीताला अत्यंत महत्त्व आहे. युगे युगे विठेवरी उभा असलेल्या श्री पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन नाम नामस्मरण केले जाते. ते संगीत कलेच्या माध्यमातून भगवंताला आळवण्याची जी कला आहे. ती अनन्य आहे. विठ्ठलाला शरण जाणे म्हणजे आत्म्याची ओळख करून घेणे. त्यामुळेच या भक्तीरसातील संगीत भजनाला विशेष महत्त्व आहे असे त्यांनी यावेळी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावरून अनेकांनी संगीत भजन व श्री पांडुरंगाच्या नामस्मरणातील गोडवा, संतांनी दिलेले साहित्य, व नामस्मरणातील समरसपणा याबद्दल विचार मांडले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, साई प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष के पी पाटील, खानापूर बँकेचे संचालक रमेश नार्वेकर समिती चे चिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, शिरोली ग्रामपंचायत चे माजी अध्यक्ष कृष्णा गुरव, निवृत्त मुख्याध्यापक एन एम पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एस बी पाटील, विकास आघाडीचे अध्यक्ष बर्मानी पाटील, भूलवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर, मर्याप्पा पाटील, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर ,प्रा शरयू कदम प्रा शंकर गावडा , कृष्णा देवलतकर यासह अनेकजण उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत संगीत विशारद व्ही एम चोर्लेकर यांनी केले. दिवसभर चाललेल्या या संगीत भजन स्पर्धेत खानापूर तालुक्यातील व बेळगाव तालुक्यातील अनेक संगीत भजन स्पर्धकांनी भाग घेतला होता.
गोल्याळीचा श्री रवळनाथ भजनी मंडळ प्रथम!
बुधवारी दिवसभर चाललेल्या या संगीत भजन स्पर्धेत तालुक्यातील जवळपास 14 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक श्री रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी, द्वितीय क्रमांक राम कृष्ण हरी भजन मंडळ जांबोटी, तृतीय क्रमांक शिव गणेश भजन मंडळ दारोळी, चौथा क्रमांक स्वयंभू भजनी मंडळ हब्बनहट्टी, पाचवा क्रमांक श्री विठ्ठल रुक्माई भजन मंडळ कुपटगिरी या भजन मंडळांनी पटकावला तर उर्वरित सातही भजन मंडळांना उत्तेजनात बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री चौराशी देवी कला मंचचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार व्हीएम चोरलेकर यांनी मांडले.