खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आर के वडारे यांनी भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्यावर केलेला आरोप चुकीचा असून शुक्रवारी नगरपंचायतीसमोर आमदार विठ्ठल हलगेकर सह भाजप नेत्यांच्या समोर झालेल्या चर्चेत युवा नेते पंडित ओगले यांनी कोणतीच जातीवाचक शिवीगाळ अथवा कोणाची मानहानी केली नाही असे असताना मुख्याधिकारी आर के वडारे यांनी युवा नेते पंडित ओगले यांच्यावर जातीवाचक शिवकाळ केल्याच्या आरोपावरून खानापूर पोलीस स्थानकात केलेली तक्रार ही चुकीची असून ती मागे घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार तसेच पोलीस स्थानकाचे निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 31 ऑगस्ट रोजी खानापूर नगरपंचायत चे सर्व कर्मचारी मुख्याधिकारी आर. के. वडारे यांच्या मनमानीमुळे संपावर गेले होते त्यामुळे नगरपंचायतच्या कारभारासंदर्भात तसेच येथील मुख्याधिकारी यांच्या मनमानी संदर्भात आमदार विठ्ठल हलगेकर सह भाजपाच्या काही नेत्यांनी उपस्थिती दर्शवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली व आमदार युवा नेते पंडित ओगले भाजपा अध्यक्ष संजय कुबल सह अनेकांनी आम्हाला साथ दिली व आमच्या समस्या जाणून घेतल्या पण यावेळी कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ अथवा कोणाची मानहानी होणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी तक्रार केली नाही अशी असताना मुख्याधिकारी आर के वडारे यांनी भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत खानापूर पोलीस स्थानकात केलेली क्रिया ही अत्यंत चुकीची आहे. वास्तविक अशा पद्धतीची कोणतीच घटना घडली नसताना जातीवादी वाचक शिवीगाळ प्रकरणी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर प्रयोजन काय असा प्रश्नही निवेदनाद्वारे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केला आहे. याप्रसंगी झालेल्या घटनाक्रमांचे व्हिडिओ व्हायरल झाले असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाचक शब्द वापरण्यात आला नाही. याची पोलिसांनी तसेच प्रभारी तहसीलदारांनी पडताळणी करून योग्य न्याय मिळवून द्यावा व सदर मुख्याधिकाऱ्यांच्या या मनमानी विरोधात त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.