IMG-20230129-WA0088


खानापूर: आगामी विधानसभेचे रणांगण उंबरठ्यावर आले असतानाच बेळगाव जिल्ह्यात राजकीय पक्षाबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बरेच फेरबदल होताना दिसत आहेत. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खानापूर तालुक्यात बरेच नेते राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधलेले दिसून येत आहेत. अशाच पद्धतीने खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये आणखीन एक मोठा धक्का निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी समितीच्या जीवावर आमदार पद भोगलेले माजी आमदार अरविंद पाटील यांनी भाजप पक्ष प्रवेश केला असतानाच आता स्वर्गीय माजी आमदार अशोकराव पाटील यांचे चिरंजीव माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल अशोकराव पाटील यांनी निधर्मी जनता दलामध्ये प्रवेश केल्यामुळे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला आणखीन एक धक्का निर्माण झाला आहे.
खानापूर तालुक्यात 2005 मध्ये जिल्हा पंचायत सदस्यत्व भूगोल गर्लगुंजी विभागात चांगले प्रस्थ निर्माण केलेले विशाल अशोकराव पाटील हे माजी आमदार स्वर्गीय अशोकराव पाटील यांचे चिरंजीव आहेत. अशोकराव पाटील यांनी 2000 च्या काळात एक वेगळाच दबदबा
तालुक्यामध्ये निर्माण करून तालुक्याला आपलंसं केलं होतं, आजही त्यांच्या कार्याची आठवण खानापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता घेते. सध्या महाराष्ट्र एकिकरण समितीचे दिवस कठीण होत असतानाच एकीकरणाची नांदी नुकताच झाली पण त्यातही काही अलबेल दिसत नसल्यामुळे माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील यांनी निधर्मी जनता दलाचे दार ठोठावले आहे. असे त्यांचे म्हणणे आहे यामुळे खानापूर तालुक्यात राजकीय वळण आता कोणत्या वळणावर जाणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
2005 च्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून गर्लगुंजी जिल्हा पंचायत मतदार क्षेत्रातून जिल्हा पंचायत सदस्यत्व मिळवलेल्या माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल अशोकराव पाटील यांनी निधर्मी जनता दलामध्ये प्रवेश केला आहे.
या संदर्भात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून विशाल पाटील हे निधर्मी जनता दलात प्रवेश करणार अशी चर्चा होती. या संदर्भात रविवारी एका पत्रकार परिषदेद्वारे विशाल पाटील यांनी आपण निधर्मी जनता दलात अधिकृत प्रवेश केले असल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, समितीमध्ये मी यापूर्वी काम केले आहे. परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीतील ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यासारख्या निष्ठावंत समिती कार्यकर्त्याला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे पसंत केले. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय भवितव्यासाठी निधर्मी असणाऱ्या निधर्मी जनता दलामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला . निधर्मी जनता दल हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. शिवाय कर्नाटकात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासारखा चांगला चेहरा असल्यामुळे या नेतृत्वाच्या कार्याची दखल घेता आपण खानापूर तालुक्यात निधर्मी जनता दलाच्या माध्यमातून संघटना बांधणीचा निर्णय घेतला असल्याचे असल्याची माहिती खानापूर लाईव्हशी बोलताना दिली. विशाल पाटील हे एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रवेशामुळे गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्रात मराठी मतदार विखुरला जाण्याची शक्यता आहे. खरंतर माजी आमदार स्वर्गीय अशोकराव पाटील यांचा खानापूर तालुक्यात आजही तितकाच दबदबा आहे. अशोकराव पाटील यांनी तालुक्यात जोडलेली माणसे व विकास कामाची रणनीती लक्षात घेता विशाल पाटील यांनी त्याच धर्तीवर खानापूर तालुक्यात काम करून निधर्मी जनता दल संघटित करण्याचा हेतू समोर आणला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्रातच नव्हे तर तालुक्यातील स्वर्गीय अशोकराव पाटील यांच्या अभिमानी असलेल्या मतदारांच्या वर त्यांच्या प्रवेशामुळे परिणाम अशी चर्चा तालुक्यातील जनतेतून व्यक्त केली जात आहे

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us