
असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा हा विचार संपले तरी सुगंध दरवळत राहावा
या उक्तीप्रमाणे श्रीमती रेणुका गंगाराम पाटील वय 75 यांचे गेल्या 21 सप्टेंबर रोजी वृद्धापकाली आजाराने निधन झाले. आम्हा कुटुंबाला त्या मायेचा आधार होत्या. चार भावंडांना लहानाचे मोठे करत सुखाचा घास भरवणारी आमची आई म्हणजे मनी साधेपणा, उच्च उच्चारसरणी व मनमळावू व्यक्तीपणाची घागर होती. त्यांच्या जाण्याने आम्हा कुटुंबावर कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- देसूर सारख्या सदनशील गावात एकेकाळी अत्यंत सामान्य व प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्रमिक कुटुंबात जन्मलेल्या आमचे वडील स्वर्गीय गंगाराम गणपती पाटील यांनी आपल्या 5 बंधूंच्या कुटुंबात लहानाचे मोठे होताना वडिलांचा आधार मोठा असायचा. आई- बाबांच्या लग्नानंतर हळुवारपणे आम्ही तीन भावंडे बहिणी वाढत गेलो. घरची प्रतिकूल परिस्थिती ही आम्हाला नेहमी सतवायची मूलतः वडील विठाचा व्यवसाय करत कधी गवळी व्यवसाय, काजू भरणे,, कधी भात भरणे असे लहान मोठे व्यवसाय करत आम्हाला लहानाचे मोठे केले. वीट व्यवसाय व समाजसेवेतही त्यांनी स्वतःला झोकून दिले. आजही त्याच पद्धतीने आम्ही तीनही चिरंजीव वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वीट व्यवसाय तसेच जेसीबी व्यवसाय करत समाजात तथा राजकारणातही आदराचे स्थान टिकून समाजात वावरात आहेत. अशामध्ये आईचा आधार एक मायेची सावली होती. आईने आम्हाला शिक्षण देण्यापासून व्यवसायात पारंगत राहण्यासाठी अनेक वेळा धडे दिले. आईचे माहेर क.नंदगड हे होते. मामेगावी जाऊन येताना आम्ही खानापूर तालुक्यातही चांगलेच परिचित झालो. त्या भागात व्यवसाय करता करता अनेकांची ओळख झाली.
- लहानपणी गरीब परिस्थितीमुळे अपुरे शिक्षण झाल्याने न डगमगता संसाराचा गाडा चालवला, वीट व्यवसायाबरोबर समाजात त्यांनी एक चांगले स्थानही राखले होते. वडील एक अभ्यास व विचारवंत तसेच श्री पांडुरंगाच्या चरणी कायम नतमस्तक राहून वारकरी संप्रदायाचा वसा अंगी बाळगत त्यांनी आपले संपूर्ण जीवन घालवले. त्यामुळे वारकरी संप्रदायातील ते एक आदर्शवत होते, त्यांनी गावात वारकरी संप्रदायाची पताका कायम राहावी. वयाच्या उत्तरार्धाच्या काळात त्यांनी आपल्या परिवाराचा सांभाळ करत सर्वांना सद्बुद्धीचे व समाजमनाचे धडे दिले, खंबीर नेतृत्व व समाजकार्याची भरपूर आवड सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे रागिस्ट तापट स्वभावाचे पण तेवढेच ममतेचा हात पाठीवर फिरून आपलंसं करून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असायची, समाजकार्यात स्वतःला झोकून देत असताना गावच्या चांगल्या गोष्टी अभिवृद्धीसाठी होणारा निर्णय हा ते कटाक्षाने घेत असत, त्यांच्या कणखर बाणा मुळे गावामध्ये त्यांच्यात बद्दल आदरयुक्त भीती होती आरोग्य ही संपदा म्हणून प्रत्येकाने आरोग्याचे जतन करावे, प्रत्येकामध्ये चांगली शरीरयष्टी यासाठी आरोग्यवंत जीवन जगण्यासाठी सर्वाना ते प्रेरित करत असायचे.
- पाटील कुटुंबीयांचा एकत्रित डोलारा त्यांनी अखंडपणे सांभाळत सर्वांना सबुरीचे सल्ले देत आपले जीवन कंठीत केले. त्यांचे आकस्मित जाणे हे मनाला चटका देणारे ठरले. त्यांच्या जाण्याने पाटील परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तो सावरण्याची शक्ती परमेश्वराने दैवत व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही आजच्या 12 व्या दिनी ईश्वरचरणी प्रार्थना
– तुझीच लेकरे.. पाटील परिवार, देसुर
